AUS vs ENG Updates In Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना लाहोरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडकडून बेन डकेटने चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. बेन डकेटने शतक झळकावत संघाला विक्रमी धावसंख्या तर गाठून दिली. पण यादरम्यान त्याने मोठी खेळी खेळत नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
बेन डकेटने ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यात १४३ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १६५ धावांची उत्कृष्ट खेळी केली. जो रूटसह बेन डकेटसह १५८ धावांची खेळीही केली. पण बेन डकेटने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या उभारली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या उभारणारा बेन डकेट हा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. २०१७ मध्ये ओव्हलवर बांगलादेशविरुद्ध १३४ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या जो रूटला त्याने मागे टाकले आहे. पण या सामन्यात डकेटने १६५ धावांचे योगदान दिले आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला इंग्लंडचा फलंदाज ठरला. केवळ इंग्लंडच नाही तर तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडसाठी सर्वात मोठी खेळी खेळणारे फलंदाज
१६५ धावा – बेन डकेट वि. ऑस्ट्रेलिया, लाहोर २०२५
१३३ धावा – जो रूट वि. बांगलादेश, द ओवल २०१७
११८ धावा – मार्कस ट्रेस्कोथिक वि. झिम्बाब्वे, कोलंबो २००२
१०४ धावा – एँड्रयू फ्लिंटॉफ वि. श्रीलंका, साऊथम्पटन २००४
१०४ धावा – मार्कस ट्रेस्कोथिक वि. वेस्ट इंडिज, द ओवल २००४
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वात मोठी खेळणारे फलंदाज
१६५ धावा – बेन डकेट वि. ऑस्ट्रेलिया, २०२५
१४५* धावा – नाथन एस्टल वि. युएई, २००४
१४५ धावा – एंडी फ्लावर वि. भारत, २००४
१४१ धावा – सौरव गांगुली वि. दक्षिण आफ्रिका, २०००
१४१ धावा – सचिन तेंडुलकर वि. ऑस्ट्रेलिया १९९८
Just how good is Ben Duckett? ? pic.twitter.com/1ICIwo1as1
— England Cricket (@englandcricket) February 22, 2025
बेन डकेटने सचिने तेंडुलकरला मागे टाकत केला वर्ल्ड रेकॉर्ड
बेन डकेटने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोठी खेळी करत सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. डकेटच्या आधी आयसीसी टूर्नामेंटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने १९९८ मध्ये १४१ धावांची खेळी केली होती. पण आता डकेटने मास्टर ब्लास्टरला मागे टाकले आहे.
आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज
१६५ धावा – बेन डकेट, लाहोर २०२५
१४१ धावा – सचिन तेंडुलकर, ढाका १९९८
१३२ धावा – निल जॉन्सन, लॉर्ड्स १९९९
१३० धावा – क्रिस हॅरिस, चेन्नई १९९६
१२९ धावा – इब्राहिम झादरान, मुंबई २०२३