ENG vs WI1st Test Ben Stokes: इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात अनेक मोठे विक्रम होत आहेत. मालिकेतील पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंड संघात पदार्पण करणाऱ्या गस ऍटकिन्सनने ७ विकेट घेत ४८ वर्षे जुना विक्रम मोडला. त्याचवेळी संघाचा स्टार गोलंदाज जेम्स अँडरसनही शेवटचा सामना खेळत आहे. अँडरसन ७०० हून अधिक बळी घेणारा आणि ४०हजारांहून अधिक चेंडू टाकणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. आता संघाच्या कर्णधारानेही एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – BCCIचा गौतम गंभीरला धक्का, प्रशिक्षक म्हणून निवडलेल्या कोचिंग स्टाफला बोर्डाने दिला नकार

स्टोक्सने वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटीतील पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या मायकेल लुईसला बाद केले. स्टोक्सने ८ षटकांत केवळ १४ धावा दिल्या. दुसऱ्या डावातही कर्क मॅकेन्झीला पहिल्याच षटकात बाद केले. त्यानंतर लुईसचीही विकेट घेतली. स्टोक्सची बॅट शांत असली तरी तो चेंडूने मात्र जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे.

हेही वाचा – IND vs SL मालिकेचं वेळापत्रक जाहीर, प्रशिक्षक म्हणून गंभीर पर्वाला होणार सुरूवात; राहुल-हार्दिककडे कर्णधारपद?

कसोटी क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा बेन स्टोक्स जगातील तिसरा खेळाडू

बेन स्टोक्सने (Ben Stokes) पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा खेळाडू कर्क मॅकेन्झीची विकेट घेतली. बेन स्टोक्सच्या कसोटी कारकिर्दीतील ही २००वी विकेट होती. स्टोक्सने १०३ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या कारकिर्दीत एकूण १०३ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ६३२० धावा आणि २०० विकेट घेतले आहेत. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिला आणि जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे.

हेही वाचा – Champions Trophy: भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही, BCCI ने ICC समोर मांडला नवा प्रस्ताव

कसोटी क्रिकेटमध्ये ६००० हून अधिक धावा करणारा आणि २०० हून अधिक विकेट घेणारा पहिला खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजचे महान खेळाडू सर गॅरी सोबर्स आहेत. सर गॅरी सोबर्स यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण ९३ कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी ८०३२ धावा आणि २३५ विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर गॅरी सोबर्स यांच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसनच्या नावावर ही कामगिरी आहे. जॅक कॅलिसने आपल्या कारकिर्दीत १६६ कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने १३२८९ धावा आणि २९२ विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ben stokes creates history in test cricket becomes third player to achieve 6000 runs and 200 wickets eng vs wi bdg