England Cricket Team Captain Ben Stokes: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिका संपली असून इंग्लंड संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडचा संघ ही मालिका सहज जिंकून अ‍ॅशेस ट्रॉफी मायदेशात आणेल, असा विश्वास वाटत होता. मात्र, तसे झाले नाही. ऑस्ट्रेलियाने पहिले दोन कसोटी सामने जिंकून सर्वांना चकित केले. त्यानंतर इंग्लंडने पुनरागमन करत दोन कसोटी जिंकल्या, तर एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता अ‍ॅशेस मालिका संपली असून, एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या स्टोक्सकडे कुटुंबासोबत घालवण्यासाठी भरपूर वेळ आहे. मात्र, तरीही त्याचा त्रास कमी होताना दिसत नाही. एका प्रवासादरम्यान स्टोक्सचे सामान हरवले आहे. यानंतर त्याने ट्वीट करून आपली समस्या सर्वांना सांगितली आणि त्यात ब्रिटिश एअरवेजला टॅगही केले. ट्वीटरवरील आपल्या पोस्टमध्ये ब्रिटिश एअरवेजला टॅग करताना, स्टोक्सने स्पष्ट केले की, “त्याची बॅग विमानातून खाली उतरवली नव्हती आणि याबाबत तुम्ही लवकरात लवकर माझा शोधून मला परत द्यावा,” अशी मदत मागितली. विमान कंपनीने त्वरीत मदतीचे आश्वासन देऊन प्रतिसाद दिला.

इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने, “ब्रिटिश एअरवेजच्या विमानातून माझी बॅग खाली उतरवली गेली नाही. तुम्ही मला लवकरात लवकर माझा सामान परत मिळवून देण्यात मदत करावी, ही विनंती.” यावर ब्रिटिश एअरवेजने उत्तर दिले “हाय बेन, हे जे काही घडले ते ऐकून आम्हाला खूप वाईट वाटते. तुम्ही आम्हाला तुमचा तपशील संदेश पाठवू शकता जेणेकरून आम्ही तुम्हाला व्यवस्थितरित्या मदत करू शकू? असे अँथनी नावाच्या एका ब्रिटिश एअरवेजच्या कर्मचाऱ्याने रिप्लाय दिला.

स्टोक्सने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली. हा अष्टपैलू खेळाडू आता वन डेमध्ये सहभागी होणार नाही. अशा परिस्थितीत स्टोक्स आपल्या गुडघ्याच्या दुखापतीवर फावल्या वेळेत उपचार करून घेण्याच्या मूडमध्ये आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो त्रस्त आहे. या कारणास्तव तो आयपीएल २०२३ मध्ये अधिक सामने खेळू शकला नाही. या दुखापतीनंतरही, स्टोक्सने अ‍ॅशेसमध्ये एक प्रमुख फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली. त्याने लॉर्ड्सवरील चौथ्या डावातील संस्मरणीय शतकासह ४०० हून अधिक धावा या मालिकेत केल्या.

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया कप आधी वकार युनूसने रोहितला दिला इशारा; म्हणाला, “आमच्याकडेही मॅच…”, पाहा video

स्टोक्स आता भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत दिसणार आहे. ही मालिका जानेवारी २०२४ मध्ये सुरू होईल. गत कसोटी चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी जिंकून आणि एक अनिर्णित राहिल्यानंतरही, इंग्लंडला स्लो ओव्हर-रेटसाठी १९-पॉइंट पेनल्टीसह केवळ नऊ गुण मिळाले.

हेही वाचा: Jyothi Yarraji: यश अपयशातील अंतर केवळ ०.०१ सेकंद! विश्वविक्रम रचणाऱ्या ज्योतीचे हुकले पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट

इंग्लंड संघाने भारतात सलग दोन कसोटी मालिका गमावल्या आहेत. इंग्लंडला भारताकडून आधी ४-० आणि नंतर ३-१ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. मात्र, भारतात कसोटी मालिका जिंकणारा इंग्लंड अजूनही शेवटचा संघ आहे. अशा परिस्थितीत नवीन बेसबॉल वृत्तीच्या जोरावर आपला संघ सामना जिंकू शकेल, अशी आशा बेन स्टोक्सला आहे. या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकाच्या तयारीसाठी इंग्लंड ३० ऑगस्टपासून न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. हे दोन्ही संघ ५ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ben stokes england captain stokes upset bag missing from plane sought help on social media know the matter avw
Show comments