टी-२० विश्वचषक २०२२ संपल्यानंतर, काही आयपीएल फ्रँचायझी बीसीसीआयला सतत प्रश्न विचारत आहेत. प्रश्न असा आहे की, इंग्लंडचा नायक बेन स्टोक्स आयपीएल २०२३ मिनी-लिलावासाठी उपलब्ध होईल का? हे लक्षात घेण्यासारखे आहे की स्टोक्सने आयपीएल २०२२ च्या लिलावासाठी त्याचे नाव दिले होते. परंतु आता फ्रँचायझी आयपीएल मिनी-लिलावाचा भाग होण्यासाठी त्याच्या होची आतुरतेने वाट पाहत आहे. स्टोक्स लिलावासाठी उपलब्ध होणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमध्ये नव्याने निवड झालेल्या सदस्याने स्टोक्सबद्दल सांगितले, “आता इतक्यात काहीही सांगणे खूप घाईचे आहे. त्याने संपर्क साधला नाही किंवा त्यांना ईसीबी कडून कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. होय, काही फ्रँचायझींनी त्याच्या उपलब्धतेबद्दल चौकशी केली आहे.”

बेन स्टोक्समध्ये इतका रस का?

इंग्लंडच्या स्टार अष्टपैलू खेळाडूने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, तो सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. स्टोक्सने २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावले. तसेच त्याच्या संघाला दुसऱ्यांदा या प्रमुख स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. त्याच्या या कामगिरीनंतर सगळेच त्याचे कौतुक करत आहेत.

स्टोक्स आयपीएलच्या मिनी लिलावात नाव देईल का?

२३ डिसेंबर रोजी होणाऱ्या मिनी-लिलावात इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि त्याच्या व्यवस्थापकाकडून त्याच्या उपलब्धतेबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा – IPL 20223 : शार्दुल ठाकूर दिल्ली कॅपिटल्समधून बाहेर पडल्यानंतर आता ‘या’ संघाचे करणार प्रतिनिधित्व

स्टोक्स हे असे नाव आहे की, सर्व १० आयपीएल संघ खरेदी करण्यास तयार असतील. विशेषत: ज्या संघांच्या ताफ्यात कोणताही मोठा अष्टपैलू खेळाडू नाही. स्टोक्सला मिनी-लिलावापासून दूर राहण्यामागे वर्कलॉर्ड हे देखील एक प्रमुख कारण असू शकते. तथापि, अद्याप याबद्दल काहीही स्पष्ट नाही कारण स्टोक्सने स्वत: या विषयावर अद्याप काहीही बोललेला नाही.

Story img Loader