Ben Stokes become first England player who taking more than 100 wickets also scored more than ten thousand runs: इंग्लंड संघाने एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ४० व्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करून या स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला आहे. सलग सहा पराभवानंतर इंग्लिश संघाने हा सामना जिंकला. इंग्लंडच्या विजयासह आता एकूण चार संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याचबरोबर भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. दरम्यान या सामन्यात बेन स्टोक्सने शतक झळकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लिश अष्टपैलू खेळाडूने ४७.५ षटकांत चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. स्टोक्सने अवघ्या ७८ चेंडूत आपले वनडेतील पाचवे आणि विश्वचषकातील पहिले शतक झळकावले. बेन स्टोक्सने ८४ चेंडूत ६ चौकार आणि तितक्याच षटकारांच्या मदतीने १०८ धावांची शतकी खेळी खेळली. आपल्या शतकी खेळीदरम्यान स्टोक्सने एक मोठा पराक्रम आपल्या नावावर केला आहे.

आपला ११४ वा एकदिवसीय सामना खेळणारा बेन स्टोक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० हून अधिक विकेट्स घेणारा आणि १०,००० हून अधिक धावा करणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. इंग्लंड संघाने १९२ धावांवर ६ विकेट गमावल्या असताना ३२ वर्षीय स्टोक्स फलंदाजीसाठी क्रीझवर आला. मात्र, त्यानंतर त्याने ख्रिस वोक्ससोबत सातव्या विकेटसाठी ८१ चेंडूत १२९ धावांची भागीदारी करत इंग्लंडला ३०० च्या पुढे नेले. स्टोक्सशिवाय डेव्हिड मलानने ७४ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८७ धावांची खेळी केली. वोक्सनेही ४५ चेंडूत पाच चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली.

हेही वाचा – ENG vs NED: बेन स्टोक्सच्या वादळी शतकाच्या जोरावर इंग्लंडचा १६० धावांनी विजय, नेदरलँड्स ठरला विश्वचषकातून बाहेर पडणारा चौथा संघ

इंग्लंड संघाने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात शानदार विजय संपादन केला. त्यानी नेदरलँडचा १६० धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडच्या खात्यात दोन गुण जमा झाले. आठ सामन्यांत त्याचे चार गुण होते. इंग्लंडला सहा सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत इंग्लंड दहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, नेदरलँडचा संघ आठ सामन्यांतील सहाव्या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ५० षटकांत नऊ बाद ३३९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ ३७.२ षटकांत १७९ धावांवर गारद झाला. या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडणारा हा चौथा संघ ठरला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ben stokes has become first england player who taking more than 100 wickets also scored more than ten thousand runs vbm
Show comments