Ben Stokes has created history by scoring the fastest fifty in Test cricket for England : बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने घरच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध १० गडी राखून जिंकला. एजबॅस्टन मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यातील चौथ्या डावात इंग्लंडला केवळ ८२ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे इंग्लंडने एकही गडी न गमावता पूर्ण केले. यासह इंग्लंडने या मालिकेत क्लीन स्वीप करण्यातही यश मिळविले. या डावात सलामीला आलेल्या स्टोक्स केवळ २८ चेंडूत ५७ धावांची वादली खेळी साकारत ४३ वर्षांपूर्वीचा जुना विक्रम मोडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा इंग्लिश खेळाडू –

एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स सलामीला आला. येताच त्याने स्फोटक फलंदाजी करत क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन केले. बेन स्टोक्सने २८ चेंडूत ९ चौकार २ षटकार मारले आणि २०३.५७ च्या स्ट्राईक रेटने नाबाद ५७ धावा केल्या. त्याने अवघ्या २४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.बेन स्टोक्स हा इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला आहे. यासह स्टोक्स सर्वात जलद अर्धशतक करणारा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी फलंदाज मिसबाह-उल-हकच्या नावावर आहे. अबुधाबीमध्ये (२०१४) ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने अवघ्या २१ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने सिडनी (२०१७) मध्ये पाकिस्तानविरुद्ध २३ चेंडूत अर्धशतक केले होते. तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी स्फोटक जॅक कॅलिस आहे. त्याने केपटाऊनमध्ये (२००५) झिम्बाब्वेविरुद्ध २४ चेंडूत ही कामगिरी केली होती. इंग्लंडसाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा बेन स्टोक्स चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा – IND vs SL 2nd T20I : सूर्या-गंभीरच्या पर्वात भारतचा पहिला मालिका विजय, श्रीलंकेचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा

बेन स्टोक्सने ४३ वर्षांचा जुना विक्रम मोडला –

यासह बेन स्टोक्सने ४३ वर्षे जुना विक्रमही मोडला. वास्तविक, याआधी इयान बोथमने इंग्लंडसाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले होते. त्याने १९८१ मध्ये दिल्लीत भारताविरुद्ध केवळ २८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आता स्टोक्सने २४ चेंडूत अर्धशतक झळकावून त्याला मागे टाकले आहे. इंग्लंडसाठी जॉनी बेअरस्टोने ३० चेंडूत आणि बेन डकेटने ३२ चेंडूत ही कामगिरी केली होती.

हेही वाचा – IND vs SL 2nd T20I Highlights : भारताचा सलग दुसऱ्या सामन्यात दमदार विजय, श्रीलंकेचा ७ विकेट्सनी पराभव करत २-० अशी घेतली अभेद्य आघाडी

इंग्लंडने १० गडी राखून सामना जिंकला –

बेन स्टोक्ससह बेन डकेटने १६ चेंडूत ४ चौकारांसह २५ धावांची नाबाद खेळी साकारली. या झंझावाती खेळीमुळे इंग्लंड संघाने १० गडी राखून सामना जिंकला. यासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचा ३-० ने धुव्वा उडवला. तिसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजने पहिल्या डावात २८२ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने ३७६ धावा केल्या. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ १७५ धावांत गडगडला. त्यामुळे इंग्लंडला केवळ ८२ धावांचे लक्ष्य मिळाले. जी त्याने स्फोटक फलंदाजी करून मिळवली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ben stokes has created history by scoring the fastest fifty in test cricket for england during eng vs wi 3rd match vbm
Show comments