Ben Stokes Lashes Out at ICC For Docking WTC Points: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका न्यूझीलंडमध्ये खेळवली जात आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंड संघाने ८ विकेट्सने जिंकला. पण या सामन्यानंतर आयसीसीने दोन्ही संघांना मोठा धक्का दिला आहे. सध्या प्रत्येक संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी प्रत्येक गुण महत्त्वाचा आहे. पण आता आयसीसीने या दोन्ही संघांचे गुण कापले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांना पहिल्या कसोटी सामन्यातील स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने दोघांनाही शिक्षा दिली आहे. दोन्ही संघांचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील प्रत्येकी ३-३ गुण कापले आहेत. आयसीसीच्या या निर्णयावर इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स नाराज आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना त्याने आयसीसीवर निशाणा साधला आहे. त्याने म्हटले आहे की, १० तासांचा दिवसाचा खेळ बाकी असताना सामना संपला आहे तरी स्लो ओव्हर रेटसाठी दंड कसा आकारला.
हेही वाचा – Pink Ball Test : पिंक बॉल टेस्ट म्हणजे काय? त्याचा वापर डे-नाईट सामन्यात का केला जातो? जाणून घ्या
बेन स्टोक्सने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक बातमी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाचे स्लो ओव्हर रेटमुळे गुण कापले जात असल्याचे म्हटले आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये स्टोक्सने लिहिले, “शाबास, आयसीसी. “दिवसाच्या खेळामधील १० तास शिल्लक असताना सामना संपला…” तरीही आयसीसीने स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावला.
न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या १५ टक्के दंड आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतील ३ गुण कापले आहेत. WTC 23-25 चक्रातील दोन्ही संघांना ही शिक्षा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर मिळाली आहे, कारण दोन्ही संघ सध्या टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. क्राईस्टचर्च येथे खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रातच संपला. हाच मुद्दा बेन स्टोक्सने मांडला आहे की जेव्हा सामना लवकर संपतो तेव्हा तुम्ही दिवसभरात किती षटके टाकलीत हे महत्त्वाचे नसते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या चक्रामध्ये आतापर्यंत इंग्लंडचे २२ गुण वजा करण्यात आले आहेत. याचा अर्थ अंदाजे दोन सामना जिंकणारे गुण गमावले आहेत. एक सामना जिंकण्यासाठी १२ गुण मिळतात. त्यामुळे इंग्लंडचा विजयाची टक्केवारीही कमी झाली आहे. यामुळेच आता इंग्लंडचा संघ सहाव्या स्थानावर आहे. इंग्लंडशिवाय ऑस्ट्रेलियाला १० गुणांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर पाकिस्तानला ८ गुणांची कपात करण्यात आली आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेशमधून प्रत्येकी ३ गुण वजा करण्यात आले असून भारताचे २ गुण वजा करण्यात आले आहेत.