Ben Stokes makes strange field placement for Steve Smith to complete Stuart Broad’s hat trick: अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व निर्माण केले आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या ३९३ धावांच्या प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने लवकर दोन गडी गमावले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ९ धावा करून बाद झाला, तर मार्नस लबुशेनला खातेही उघडता आले नाही. यानंतर स्मिथ आणि ख्वाजा यांच्यात छोटीशी भागीदारी नक्कीच झाली, पण ही भागीदारीही स्मिथच्या विकेटसोबत तुटली. स्मिथने ५९ चेंडूत १६ धावांची खेळी खेळली.
बेन स्टोक्सचे विचित्र फील्ड प्लेसमेंट –
ऑस्ट्रेलियाच्या या अवस्थेत सोशल मीडियावर क्रिकेट चाहते बेन स्टोक्सच्या कर्णधारपदावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. खरे तर शनिवारी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने डेव्हिड वॉर्नर आणि लॅबुशेनला सलग दोन चेंडूत बाद केले, तेव्हा बेन स्टोक्सने ब्रॉडची हॅट्ट्रिक पूर्ण करण्यासाठी विचित्र क्षेत्ररक्षण लावले. जे सहसा कसोटी सामने किंवा कोणत्याही फॉरमॅटमध्ये दिसत नाही.
स्टोक्सचे फील्ड प्लेसमेंट कसे होते?
बेन स्टोक्सने सर्व क्षेत्ररक्षक स्टीव्ह स्मिथच्या अगदी जवळ सेट केले. यादरम्यान, स्टोक्सने ऑफ साइड तसेच लेग साइड आणि शॉर्ट मिड ऑन अशा दोन स्लिप्स तैनात केल्या. स्मिथने हॅटट्रिक करणारा चेंडू कोणताही धोका न पत्करता सोडला. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर काही वेळातच इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरच्या रूपाने संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर पुढच्याच चेंडूवर मार्नस लबुशेन गोल्डन डकचा बळी ठरला. सामन्याबद्दल बोलायचे तर, ४० षटकानंतर ऑस्ट्रेलियान ३ बाद ११५ धावा केल्या आहेत. ट्रॅव्हिस हेड ३० आणि उस्मान ख्वाजा ५० धावांवर खेळत आहेत.
हेही वाचा – Virat Kohli: महाकालच्या दर्शनानंतर आता विराट-अनुष्का कीर्तन ऐकण्यासाठी लंडनमध्ये पोहोचले, VIDEO व्हायरल
बेन स्टोक्सच्या फील्ड प्लेसमेंटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया –
बेन स्टोक्सच्या फील्ड प्लेसमेंटवर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया येत आहेत. चाहत्यांना आश्चर्य वाटले की स्टोक्सने अशा फील्ड प्लेसमेंटचा विचार कसा केला? एका चाहत्याने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले आहे की, भाऊ तुम्ही काय करत आहात? आणखी एका चाहत्याने म्हटले आहे की, खेळपट्टीवर हे भरतनाट्यम काय चालले आहे?