Ben Stokes pulls out of ICC T20 World Cup 2024 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेला आयपीएलच्या १७व्या हंगामानंतर १ जूनपासून सुरुवात होणार आहे. याआधी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने विश्वचषक स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. यामुळे करोडो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

या दिग्गज खेळाडूला विश्वचषकात खेळताना पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते, मात्र या खेळाडूनेच आगामी टी-२० विश्वचषकातून आपले नाव मागे घेतले आहे. हा अनुभवी खेळाडू संघाचा भाग राहिला असता, तर तो स्वबळावर सामने जिंकून देऊ शकला असता, मात्र या खेळाडूच्या माघार घेण्याने संघासह करोडो चाहत्यांनाही धक्का बसला आहे. दिग्गजाने आपले नाव मागे घेतले आहे, यावर चाहत्यांना विश्वास बसत नाही.

IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान
IPL 2025 Mega Auction Most Expensive Foreigner Player
IPL 2025 : जोस बटलर किंवा मिचेल स्टार्क नव्हे तर… दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ युवा अष्टपैलू ठरु शकतो सर्वात महागडा परदेशी खेळाडू
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली माहिती –

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘इंग्लंडचा पुरुष क्रिकेटपटू बेन स्टोक्सने आज पुष्टी केली आहे की, जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणाऱ्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकापूर्वी निवडीसाठी त्या नाव विचारात घेतले जाणार नाही.’ निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराचे लक्ष केवळ कसोटी क्रिकेटसाठीच नव्हे तर भविष्यातील सर्व क्रिकेटसाठी गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त असणे आहे. इंग्लंड संघ वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध दोन-तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.’

हेही वाचा – MI vs RR : राजस्थानने सलग तिसरा विजय मिळवत गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान, मुंबईला ६ विकेट्सनी नमवले

बेन स्टोक्स काय म्हणाला?

बेन स्टोक्सने आपल्या निवेदनात सांगितले की, ‘मी कठोर परिश्रम करत आहे आणि क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये अष्टपैलू म्हणून माझी भूमिका निभावण्यासाठी माझा गोलंदाजी फिटनेस मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे आयपीएल आणि विश्वचषक न खेळणे हे मला भविष्यात अष्टपैलू खेळाडू बनण्यास मदत करेल.’

हेही वाचा – T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार

बेन स्टोक्सची टी-२० कारकीर्द –

बेन स्टोक्सने आतापर्यंत इंग्लंडकडून ४३ टी-२० सामने खेळले आहेत. या कालावधीत बेन स्टोक्सने २१.६७ च्या सरासरीने ५८५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचबरोबर बेन स्टोक्सनेही या कालावधीत २६ विकेट्स घेतल्या आहेत. २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला चॅम्पियन बनवण्यात बेन स्टोक्सचे मोठे योगदान होते. त्याने अंतिम सामन्यात ४९ चेंडूत नाबाद ५२ धावा करत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.