England vs New Zealand 2nd Test Match: इंग्लंड आणि न्यूझीलंड संघातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आज पार पडला. या रोमांचक सामन्यात न्यूझीलंडने एका धावेने विजय मिळवत इतिहास रचला. त्याचबरोबर दोन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्याने इंग्लंडला पराभवाचा सामना का करावा लागला याबद्दल सांगितले.
कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला, हा कसोटी क्रिकेटमधला अविश्वसनीय सामना होता. आपल्या संघाला पराभवाचा सामना का करावा लागला हेही स्टोक्सने सांगितले. बाऊन्स झालेल्या चेंडूंवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना, तो आऊट झाल्याचेही त्याने सांगितले. त्याने किवी संघाचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरचेही कौतुक केले ज्याने ४ विकेट घेतल्या.
सामन्यानंतरच्या सादरीकरणात बेन स्टोक्स म्हणाला, “हा खेळ कसोटी क्रिकेट म्हणजे काय याबद्दल होता. तो केवळ अविश्वसनीय होता. आम्ही ज्या भावनांमधून जात होतो, साहजिकच किवीजही असाच विचार करत होते. अशा प्रकारच्या कसोटी सामन्याचा भग असणे अविश्वसनीय होते. हा संपूर्ण पैसे वसूल करणारा सामना होता. तो परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबद्दल होता. आम्हाला पहिल्यापासून माहित होते की, भागीदारी (माझ्या आणि रूटमधील) कुठपर्यंत पोहोचू शकते, परंतु टिम साऊथीला कोणत्या तरी गोष्टीने फासा पलटवायचा होता.”
संघाचा पराभव का झाला हे त्यांनी पुढे सांगितले. तो म्हणाला, “वॅग्स (नील वॅग्नर) आला आणि त्याने आपल्या संघासाठी विजयाचा दरवाजा उघडला. माझ्यासाठी आणि जो रूटसाठी आमच्या संघासाठी संधी निर्माण करणे आणि पुनरागमन करण्याचा प्रयत्न होता. कधीकधी काही गोष्टी तुम्हाला पाहिजे तशा घडत नाहीत. त्या बाउंसर योजनासह आम्हाला निर्णय घ्यायचा होता. अर्थातच ते आमच्यासाठी उपयुक्त ठरले नाही. आम्हाला तिथे धावा करण्याची संधी होती.”
स्टोक्स म्हणाला, “वॅगी त्या बाऊन्सर्ससह गोलंदाजी करायला येताच, मी षटकातून २० धावा काढून खेळ आमच्या बाजूने वळवण्याची संधी म्हणून पाहिले, पण तसे झाले नाही. या कल्पनेसाठी (बाऊंसरसह हल्ला ) वॅग्गी आणि टिम साउथी यांना श्रेय द्यायला हवे. येथे पराभव पत्करावा लागणे निराशाजनक आहे. गेल्या वर्षी आमचे उन्हाळी सत्र खूप चांगले राहिले होते. आता ऍशेसपूर्वी आमच्याकडे काही महिन्याचा कालावधी आहे. आम्ही या कालावधीत काही जे काही बदल करु शकतो ते करू.”
सामन्याबद्दल बोलायचे तर, इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ८ बाद ४३५ धावा केल्या होत्या. यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव २०९ धावांत गुंडाळला गेला. इथे बेन स्टोक्सने दुसरी आणि सर्वात मोठी चूक केली. २२६ धावांची आघाडी घेऊन स्टोक्सने न्यूझीलंडला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. इंग्लिश गोलंदाज आधीच थकले होते, त्यामुळे किवी फलंदाजांनी याचा फायदा घेत दुसऱ्या डावात ४८३ धावांची मजल मारली. त्यानंतर न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु दुसऱ्या डावात संपूर्ण इंग्लिश संघ २५६ धावांवर गारद झाला.