Ben Stokes said I am not going to change my leadership style: अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दोन विकेट्सने पराभव केला. बर्मिंगहॅममध्ये खेळवण्यात आलेला कसोटी सामना अतिशय रोमांचक होता. पाचही दिवस इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. दरम्यान, पहिल्या दिवशी डाव घोषित करणे हेच इंग्लंडच्या पराभवाचे कारण ठरले का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इंग्लंड संघाने कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ८ बाद ३९३ धावा करून शेटचे सेशन संपण्यापूर्वी डाव घोषित केला. तेव्हा जो रूट शतक झळकावून नाबाद होता.

सामना संपल्यानंतर बेन स्टोक्सने इंग्लंडचा पहिला डाव घोषित करण्याच्या निर्णयाचा बचाव केला. तसेच त्याच्या नेतृत्वशैलीत बदल करणार नसल्याचेही सांगितले. बेन स्टोक्स म्हणाला, ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलल्यानंतर दुसऱ्या दिवशी मैदानात उतरण्याची इच्छा होती. कर्णधार पॅट कमिन्स, ज्याने नॅथन लायनसह ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. त्याला स्टोक्सच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले नाही, परंतु त्याने इतक्या लवकर डाव घोषित केला नसता, असे सांगितले.

AUS vs PAK Pat Cummins responding to Kamran Akmal mockery of the Australian team
AUS vs PAK : कामरान अकमलला ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली उडवणे पडले महागात; पॅट कमिन्सने दिले चोख प्रत्युत्तर, VIDEO व्हायरल
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
India Must be Missing Rahul Dravid Pakistan Former Cricketer Basit Ali Slams Gautam Gambhir and IPL Like Tactics After Whitewashed
IND vs NZ: “आज भारताला द्रविडची आठवण येत असेल…”, पाकिस्तानी माजी खेळाडूने व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला सुनावलं, IPL रणनितीवर उपस्थित केले प्रश्न
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep
IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित
IND vs NZ India broke the embarrassing record of 50 years ago
IND vs NZ : भारताचा ५० वर्षांनंतर मायदेशात पहिल्यादांच नकोसा विक्रम, काय आहे ही नामुष्की? जाणून घ्या
Rohit Sharma Warned by Umpires Due to Sarfaraz Khan as He was Sledging Daryl Mitchell During IND vs NZ 3rd Test Watch Video
IND vs NZ: सर्फराझ खानमुळे वैतागलेल्या मिचेलने पंचांकडे केली तक्रार, रोहित शर्मा मात्र युवा खेळाडूच्या पाठीशी खंबीरपणे उभा, पाहा काय घडलं?

मायकेल वॉनला स्टोक्सचे प्रत्युत्तर –

बीबीसी टेस्ट मॅच स्पेशलवर, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणाला की, “जर अशी परिस्थिती उद्भवली, तर स्टोक्स दुसऱ्या कसोटीत अशा प्रकारे डाव घोषित करणार नाही. तो आणखी ३०-४० धावा करण्याचा प्रयत्न करेल.” सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत याला उत्तर देताना स्टोक्स म्हणाला, “आम्ही अशा परिस्थितीत असतो तर? होय, मला दिवसात २० मिनिटे शिल्लक असताना ३९८/६ डाव घोषित करायला आवडेल. ते विलक्षण असेल. मी असेही म्हणू शकतो की, जर आम्ही डाव घोषित केला नसता, तर पाचव्या दिवसाच्या शेवटी असा उत्साह पाहिला असता का? मला वाटते १०० टक्के नाही, परंतु मी या सामन्यातील जर-तर या गोष्टीकडे बघणार नाही. वास्तविकता ही आहे की आम्ही जिंकू शकलो नाही.”

हेही वाचा – ENG vs AUS: ऑस्ट्रेलियाने धावांचा पाठलाग करताना नोंदवला ७५ वर्षांतील सर्वात मोठा विजय, ‘या’ पराभवाचा घेतला बदला

पहिल्या दिवशी डाव घोषित करण्याच्या निर्णयाबाबत स्टोक्स काय म्हणाला?

पहिल्या दिवशी डाव घोषित करण्याच्या निर्णयाबाबत स्टोक्स म्हणाला की, मला ख्वाजा आणि वॉर्नरवर दडपण आणण्याची संधी वाटली. विरोधी संघ आणि ऍशेस मालिकेमुळे तो आपली धाडसी नेतृत्वशैली बदलणार नाही. स्टोक्सने सामन्यानंतर सांगितले, “मला वाटले की ही ऑस्ट्रेलियावर दबाव आणण्याची संधी आहे. अॅशेसमुळे मी माझी क्रिकेट शैली बदलणार नाही. कोणास माहित, आम्ही दोन चेंडूंत दोन विकेट गमावल्या असत्या की अतिरिक्त ४० धावा करू शकलो असतो. मी जर-तरच्या गोष्टीत अडकून पडणारा कर्णधार नाही. आम्हाला वाटले की, ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर आणण्याची आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात मजबूत स्थितीत करण्याची ही संधी आहे.”