Ben Stokes said It’s a very difficult moment for us: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मँचेस्टर येथे खेळवण्यात आलेला ॲशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्याच्या अनिर्णायक निकालामुळे इंग्लंड संघाचे मोठे नुकसान झाले आहे. यजमानांनी २०१५ नंतर प्रथमच ॲशेस जिंकण्याची सुवर्णसंधी वाया घालवली. या सामन्यात एकवेळ इंग्लंड विजयाच्या जवळ पोहोचले होते. त्यानंतर पावसामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे संघाचा कर्णधार बेन स्टोक्स खूपच निराश झाला आहे. त्याने यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेन स्टोक्सने व्यक्त केल्या भावना –

सामना संपल्यानंतर बेन स्टोक्स म्हणाला, “तुम्हाला माहित आहे की हा आमच्यासाठी खूप कठीण क्षण आहे. आम्ही पहिले ३ दिवस ज्या प्रकारचे क्रिकेट खेळलो त्याचे परिणाम हवामानाने दिले नाहीत. खरे सांगायचे तर ही एक कठीण गोष्ट आहे. पण तो आमच्या खेळाचा भाग आहे. या सामन्यात येण्यापूर्वी आमच्यासाठी करो या मरो अशी परिस्थिती होती. ऑस्ट्रेलियाला ३२० च्या आसपास आऊट करणे आणि नंतर ५९० धावा करणे, आम्ही याच्यापेक्षा जास्त काही करू शकलो नसतो. आता पुढचा सामना खेळताना आम्हाला खूप अभिमान वाटेल.”

इंग्लंडचा संघ पुढील सामन्यात विजयाच्या इराद्याने उतरेल –

बेन स्टोक्स पुढे म्हणाले, “आमचा एक सामना बाकी आहे आणि आम्हाला विजय मिळवून २०१९ प्रमाणे ही मालिका बरोबरीत राखायची आहे. हा शेवटचा सामना एक संघ म्हणून आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे आम्हाला माहीत आहे. आम्हाला चांगला पाठिंबा मिळाला आहे आणि आशा आहे की गर्दी पुन्हा जमेल आणि आम्ही जिंकू.”

हेही वाचा – Ishan Kishan: ऋषभच्या बॅटने इशानचे झंझावाती अर्धशतक; सामन्यानंतर म्हणाला, “यारा तेरी यारी को…”, पाहा Video

ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका आपल्याकडे कायम राखली –

चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतरही ऑस्ट्रेलिया मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. अशा स्थितीत इंग्लंडने शेवटचा सामना जिंकला तरी मालिका अनिर्णित राहील. ॲशेसच्या नियमांनुसार, मालिका अनिर्णित राहिल्यास, मागील मालिका जिंकलेल्या संघाकडे अॅशेस राहते. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाने मागील मालिका जिंकली होती, त्यामुळे ही मालिका पुन्हा एकदा त्यांच्या नावावर होणार आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात ३१७ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये मार्नस लाबुशेन (५१) आणि मिचेल मार्श (५१) यांनी अर्धशतकं झळकावली होती. इंग्लंडने पहिल्या डावात ५९२ धावांची मजल मारली. यात जॅक क्रॉलीच्या १८९ आणि जॉनी बेअरस्टोच्या नाबाद ९९ धावांचा समावेश होता. पहिल्या डावाच्या जोरावर इंग्लंडने २७५ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात पावसाने सामना अनिर्णीत होण्यापूर्वी ५ बाद २१४ धावा केल्या होत्या

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ben stokes said its a very difficult moment for us as the fourth match ended in a draw vbm