विदर्भच्या अक्षयचे चार बळी
सलामीसाठी शतकी भागीदारी होऊनही बंगाल संघाला विदर्भ संघाच्या संमिश्र माऱ्यापुढे अपेक्षेइतकी भक्कम धावसंख्या रचता आली नाही. त्यामुळेच या दोन संघांमधील रणजी क्रिकेट सामन्यात त्यांना पहिल्या दिवशी ७ बाद २१७ धावांपर्यंतच पोहोचता आले.
घरच्या मैदानावर खेळताना अभिमन्यू ईश्वरन व सयान मोंडाल यांनी सलामीसाठी ११८ धावांची भागीदारी केली. या दोघांनीही अर्धशतके टोलविली मात्र त्यांनी रचलेल्या पायावर त्यांना भक्कम धावसंख्या रचण्यात अपयश आले. विदर्भ संघाचा फिरकी गोलंदाज अक्षय वाखरेने चार बळी घेत प्रभावी कामगिरी केली.
विदर्भ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले मात्र त्यांचा हा निर्णय सुरुवातीला फलदायी ठरला नाही. ईश्वरन व मोंडाल यांनी विदर्भच्या अनुभवी माऱ्यापुढे दमदार शतकी पाया रचला. ईश्वरन याने १० चौकारांसह ५८ धावा केल्या. मोंडाल याने केलेल्या ५६ धावांमध्ये आठ चौकारांचा समावेश होता. ही जोडी फुटल्यानंतर बंगालच्या डावाची घसरगुंडी उडाली. ही घसरगुंडी होत असताना एका बाजूने सुदीप चटर्जी याने झुंजार खेळ केला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सुदीपने नाबाद ४९ धावा केल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा