‘बुल्स चार्ज माडी.. बुल्स चार्ज माडी.. (बुल्स धडक)’ या जयघोषाने कबड्डीचे मैदान दणाणून गेले होते आणि तसाच बहारदार खेळ करत बंगळुरू बुल्सने दिल्ली दबंगला धडक देत ४०-२१ असा सहजपणे विजय मिळवला. घरच्या मैदानात बंगळुरूचा हा पहिला विजय असून त्यांना पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या लढतीत पाटणा पायरेट्सने बंगाल वॉरियर्सवर ३४-३२ अशी मात केली.
आक्रमक चढाया आणि नेत्रदीपक पकडींच्या जोरावर बंगळुरूने मध्यंतराला २१-८ अशी आघाडी घेतली, तेव्हाच त्यांचा विजय निश्चित झाला होता. गेल्या सामन्यात दिल्लीला २४ गुण मिळवून देणारा काशलिंग आडकेला या सामन्यात फक्त चारच गुणांवर समाधान मानावे लागले. काशिलिंग बंगळुरूच्या जाळ्यात अडकत गेला आणि तिथेच दिल्लीच्या संघाचे मानसिक खच्चीकरण झाले. बंगळुरूने या सामन्यात दिल्लीवर तीन लोण चढवले. बंगळुरूकडून अजय ठाकूरने चढाईत ७ गुण कमावले, तर धर्मराजने चढाई आणि पकडींमध्ये प्रत्येकी ४ गुण पटकावले.
दुसऱ्या सामन्यात सुरुवातीपासून पाटणाने जोरदार आक्रमण करत मध्यंतराला १८-१२ अशी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रात मात्र बंगालच्या खेळाडूंनी दमदार खेळ केला. पाटणाच्या संघाने महेंद्र राजपूत आणि सुनील जयपाल यांच्या उत्तम पकडी करत विजय मिळवला. पाटणाकडून गुरिंदर सिंगने एकूण ११ गुणांची केली. बंगालचा कर्णधार सुनील जयपालने चढाईत सहा आणि ‘सुपर टॅकल’चे दोन असे एकूण आठ गुण कमावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजचे सामने
* पाटणा पायरेट्स वि. यू मुंबा
*  बंगळुरू बुल्स वि. तेलुगू टायटन्स
वेळ : रात्री ७.५० वा.पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२ आणि ३, स्टार स्पोर्ट्स एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी.

आजचे सामने
* पाटणा पायरेट्स वि. यू मुंबा
*  बंगळुरू बुल्स वि. तेलुगू टायटन्स
वेळ : रात्री ७.५० वा.पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२ आणि ३, स्टार स्पोर्ट्स एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी.