विश्वविजेत्या सॅबेस्टियन वेटेल याने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीसह रेड बुल संघाने पहिले दोन क्रमांक मिळविले आणि फॉम्र्युला-वन ग्रां. प्रि. शर्यतीपूर्वीच्या सराव सत्रात वर्चस्व राखले. जगातील सर्वोत्तम चालक किताब लागोपाठ चौथ्यांदा जिंकण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वेटेलने सराव शर्यतीत एक मिनिट २५.९०८ सेकंद वेळ नोंदविली आणि प्रथम क्रमांक मिळविला. त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मार्क वेबरने दुसरे स्थान घेतले. व्हेटेलने फेरारी संघाच्या फर्नान्डो अलोन्सो याला शेवटच्या टप्प्यात मागे टाकले. मॅक्लेरिन संघाचा खेळाडू जेन्सन बटन हा अकराव्या क्रमांकावर फेकला गेला. जर्मनीच्या निको रॉसबर्ग याने मर्सिडीज संघाचे प्रतिनिधित्व करताना ही शर्यत एक मिनिट २६.३२२ सेकंदात पार केली. त्याला तिसरे स्थान मिळाले. माजी विश्वविजेत्या किमी रैक्कोनन याला चौथे स्थान मिळाले. त्याचा फ्रेंच सहकारी रोमेन ग्रोसजीन याने पाचवा क्रमांक मिळविला.

Story img Loader