Harbhajan Singh on Test Cricket: भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग त्याच्या आवडत्या खेळाडूंच्या नावाचे चुकीचे स्पेलिंग लिहिल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. भज्जीला रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांच्या नावाचे अचूक स्पेलिंगही माहित नसल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. हरभजनने ट्वीटरवर आपल्या पाच आवडत्या कसोटी क्रिकेटर्सची निवड केली. यामध्ये त्याने विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विनसारख्या दिग्गजांचा समावेश केला नाही. मात्र, चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंपेक्षा जास्त आश्चर्य वाटले ते त्यांच्या नावाचे चुकीचे स्पेलिंग लिहिल्याचे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हरभजन सिंगने आपल्या ट्वीटमध्ये ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायन, स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ, भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांना आपले आवडते कसोटी खेळाडू म्हणून निवडले आहे. त्याची खेळाडूंची निवड समजण्यासारखी आहे, परंतु त्याने त्यातील चार नावांचे स्पेलिंग चुकीचे लिहिले आहे. भज्जीने फक्त नॅथन लियॉनचे नाव बरोबर लिहिले आहे. भज्जीने ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या नावांचे स्पेलिंग चुकीचे लिहिले आहे. यानंतर त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले.
हरभजनने जो रूटचा देखील समावेश केला नाही, जो सध्या जबरदस्त फॉर्म आहे आणि २०२१-२३ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चक्रात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. भज्जीचे हे ट्वीट दुसर्या ट्वीटला प्रत्युत्तर म्हणून होते ज्यात बेन स्टोक्स आणि पॅट कमिन्स हे सर्वकाळातील सर्वोत्तम कसोटीपटूंमध्ये समाविष्ट होते. याबरोबरच आणखी तीन नावे देण्यास सांगितले होते. भज्जीने सुद्धा पॅट कमिन्सला त्याच्या आवडत्या खेळाडूंमध्ये समाविष्ट केले नाही, त्याने बेन स्टोक्सचे नाव लिहिले. परंतु त्याने स्टोक्सच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे लिहिले.
नुकताच आपला ४३वा वाढदिवस साजरा करणाऱ्या हरभजनने २०२१मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २०२१च्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी त्याने शेवटचा सामना खेळला होता. त्याने भारताकडून शेवटचा २०१६ मध्ये खेळला होता. त्याने देशासाठी एकूण १०३ कसोटी सामने, २३६ एकदिवसीय सामने आणि २८ टी२० सामने खेळले आहेत. आता तो आम आदमी पार्टीकडून राज्यसभेचा खासदारही आहे. हरभजन सध्या समालोचनात व्यस्त असून भविष्यात तो प्रशिक्षकाची जबाबदारीही सांभाळू शकतो.
हरभजन सिंगची संपप्ती किती आहे?
हरभजन सिंगने क्रिकेटच्या जाहिराती आणि टीव्ही शोमधून भरपूर कमाई केली आहे. छोटय़ाशा घरात बालपण घालवणाऱ्या हरभजन सिंगची आज देशातील अनेक शहरांमध्ये घरे आणि व्यावसायिक मालमत्ता आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, हरभजन सिंगकडे २०२२ मध्ये एकूण ८१ कोटी रुपयांची संपत्ती होती.
राज्यसभेसाठी नामांकन करताना हरभजन सिंग यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात त्याचे वार्षिक उत्पन्न ५,७८,१६,७३० रुपये होते. त्याच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये दाखवण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, हरभजनकडे ८ लाख रुपये रोख आणि सुमारे १४ कोटी रुपये बँकेत ठेवी आहेत. हरभजनने रोखे, डिबेंचर्स आणि शेअर्समध्ये १ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय त्यांच्याकडे २.५ कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीही आहेत. हरभजनकडे ७० लाख रुपयांची घड्याळेही आहेत. अशा प्रकारे त्यांच्याकडे एकूण २२ कोटींची जंगम मालमत्ता आहे.
देशातील अनेक शहरांमध्ये मालमत्ता
हरभजन सिंगची मुंबईतील सांताक्रूझ, चंडीगड, मोहाली, जालंधर, अहमदाबाद आणि आंध्र प्रदेशातील नलगंडा जिल्ह्यात स्थावर मालमत्ता आहे. त्यांची एकूण किंमत ५९ कोटी रुपये आहे. हरभजन सिंगच्या चंडीगडमधील घराची किंमत २८ कोटी रुपये आहे. त्याच्या पत्नीकडेही दोन कोटींचे घर आहे. अशाप्रकारे, २०२२मध्ये हरभजन सिंगची एकूण स्थावर आणि जंगम संपत्ती एकूण ८१ कोटी रुपये आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात हरभजनने सांगितले आहे की, “त्याच्याकडे मर्सिडीज ४ मॅटिक, महिंद्रा एक्सयूव्ही ५००, टोयोटा फॉर्च्युनर आणि इनोव्हा क्रिस्टा ही वाहने आहेत.”