Bhavani Devi In Asian Fencing Championships: भारताची तलवारबाज भवानी देवीने इतिहास रचला आहे. आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये, भवानीने या खेळातील विद्यमान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनला पराभूत करून देशाला पहिले पदक मिळवून दिले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्येही भवानीची कामगिरी दमदार होती, पण ती पदकापासून वंचित राहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय तलवारबाज भवानी देवीने सोमवारी इतिहास रचला. खरं तर, भवानी देवीने चीनमधील वूशी येथे झालेल्या आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपच्या महिला सेबर स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यात भवानी देवीला पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र असे असतानाही भवानी देवीने इतिहास रचला. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक आहे.

भवानीने इतिहास रचला

भवानी देवीने या विजयासह भवानीने या चॅम्पियनशिपमधील भारताचे पहिले पदकही निश्चित केले आहे. भवानीने वर्ल्ड चॅम्पियनवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आणि मिसाकीला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. मिसाकी इमुरा ही वर्ल्ड चॅम्पियन आहे आणि तिच्याविरुद्ध भवानीची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे.

भवानी देवीला उपांत्य फेरीत झेनाब डेबेकोवाकडून पराभूत केले

चीनमधील वूशी येथे सुरू असलेल्या आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये महिला सेबर स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भवानीला उझबेकिस्तानच्या झेनाब डेबेकोवाने पराभूत केले. या सामन्यात झैनाब देबेकोवाने भवानीचा १४-१५ असा पराभव केला, पण तरीही भवानी देवीने या स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक निश्चित केले. तत्पूर्वी, भवानी देवीने उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या जपानच्या मिसाकी इमुरा हिला १५-१० असे पराभूत करून मोठा अपसेट केला होता. वास्तविक, मिसाकीविरुद्ध भवानीचा हा पहिला विजय होता. यापूर्वी प्रत्येक वेळी जपानच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंचा पराभव केला होता.

हेही वाचा: Indian Captain: “IPL आणि फक्त कोटींची कमाई…” भारताच्या बेंच स्ट्रेंथवरून माजी निवडकर्ते दिलीप वेंगसरकारांची BCCIवर सडकून टीका

भवानीचे टोकियो ऑलिम्पिकमधील पदक हुकले होते

टोकियो ऑलिम्पिकमध्येही भवानी देवीची कामगिरी उत्कृष्ट होती. देशासाठी पदक जिंकण्यात ती हुकली असली तरी तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक झाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भवानीची स्तुती केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhavani devi created history by defeating world champion confirmed first medal in asian fencing championship avw
Show comments