उत्सुकता निर्माण झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) निवडणुकीत मोहन भावसार, सुंदर अय्यर व रवींद्र कांबळे यांची प्रथमच कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली. प्रशांत देशपांडे, प्रताप जाधव, एम. एफ. लोखंडवाला, किशोर वैद्य व वली मोहम्मद यांची फेरनिवड झाली.
एमओएच्या कार्यकारिणीतील आठ जागांकरिता १३ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे या निवडणुकीविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. ही निवड एकमताने व्हावी यासाठी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी खूप आटोकाट प्रयत्न केले होते. सोमवारी सायंकाळी त्याकरिता सर्व उमदेवारांची बैठक घेण्यात आली. मात्र रेखा भिडे यांचा अपवाद वगळता एकाही उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला नाही.
एमओएशी संलग्न असलेल्या २४ संघटनांपैकी यॉटिंग संघटनेचा अपवाद वगळता अन्य २३ खेळांच्या संघटनांना मतदानाचा अधिकार होता. त्यापैकी खो-खो संघटनेचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, कुस्तीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, जलतरणाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, जिम्नॅस्टिक्सच्या अध्यक्ष मीरा कोरडे, ज्यूदोचे सरचिटणीस दत्तात्रय आफळे, व्हॉलिबॉलचे अध्यक्ष विजय डांगरे हे या बैठकीस उपस्थित राहिले नाहीत.
महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे सरचिटणीस मोहन भावसार हे सर्वाधिक मते मिळवून निवडून आले. त्याखालोखाल प्रशांत देशपांडे (तिरंदाजी), सुंदर अय्यर (टेनिस), प्रताप जाधव (सायकलिंग), रवींद्र कांबळे (व्हॉलिबॉल), एम. एफ. लोखंडवाला (रोइंग), किशोर वैद्य (जलतरण), वली मोहम्मद (फुटबॉल) हे निवडून आले. एम. व्यंकटेश, शीला कानुंगो, अमिन दयानंद कुमार व अशोक सिंग रजपूत यांचा पराभव झाला. संघटनेच्या उपाध्यक्षपदी प्रल्हाद सावंत, अशोक पंडित, प्रदीप गंधे, जय कवळी यांची निवड झाली. सहसचिवपदी प्रकाश तुळपुळे व महेश लोहार तर खजिनदारपदी धनंजय भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमओएत महिलांना स्थान नाही!
महाराष्ट्रास राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंमध्ये महिला खेळाडूंची संख्या मोठी असली तरी एमओएच्या कार्यकारिणीत महिलांना स्थान नाही हे स्पष्ट झाले. यंदा रेखा भिडे व शीला कानुंगो या दोन महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी रेखा भिडे यांनी माघार घेतली. कानुंगो यांचा मात्र पराभव झाला. एमओएने यापूर्वी एम. एफ. लोखंडवाला यांना स्वीकृत सदस्य म्हणून स्थान दिले होते. त्याप्रमाणे कार्यकारिणीत एखाद्या महिला संघटकास स्थान दिले जावे, अशी आशा अनेक महिला खेळाडू व संघटकांनी व्यक्त केली.

कार्यकारिणी : अध्यक्ष- अजित पवार, उपाध्यक्ष- अशोक पंडित, प्रल्हाद सावंत, जय कवळी, प्रदीप गंधे, सरचिटणीस- बाळासाहेब लांडगे, सहसचिव- प्रकाश तुळपुळे, महेश लोहार, खजिनदार- धनंजय भोसले, सदस्य- मोहन भावसार, प्रशांत देशपांडे, सुंदर अय्यर, प्रताप जाधव, रवींद्र कांबळे, एम. एफ. लोखंडवाला, किशोर वैद्य, वली मोहम्मद.