भारतीय टेनिसपटू महेश भूपती आणि रोहन बोपण्णा या जोडीला फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर, लिअँडर पेस आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार जुर्गन मेल्झर याजोडीने पुढील फेरीत प्रवेश केलाय. यास्पर्धेत दुहेरी खेळासाठी चौथे नामांकन मिळालेल्या भूपती आणि बोपण्णा यांचा पोलंडच्या टोमाझ बेडनारेक आणि जेर्झी जानोविच या जोडीने ५-७, ४-६ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. या जोडीने भूपती आणि बोपण्णा यांना अवघ्या ७६ मिनिटांत पराभव केला.
यानंतर आता थायलँडच्या सानचाई रातीवाताना आणि सोन्चात रातीवाताना व इटालियन जोडी, पोलो लोरेन्झी आणि पोतितो स्तराचे यांच्या दरम्यान होणाऱ्या सामन्याच्या विजयी जोडीबरोबर टोमाझ बेडनारेक आणि जेर्झी जानोविच ह्या विजयी जोडीचा पुढील सामना होणार आहे. 

Story img Loader