भारताच्या महेश भूपती आणि रोहन बोपण्णा यांनी गतविजेत्या मॅक्स मिर्नी व डॅनियल नेस्टोर जोडीचा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.
पाचव्या मानांकित भूपती-बोपण्णा जोडीने ‘ब’ गटातील अटीतटीच्या लढतीमध्ये मिर्नी-नेस्टोर जोडीला ७-६(५), ६-७(५) आणि १०-५ असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. पहिल्या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाल्यावर खेळवण्यात आलेल्या टायरब्रेकरमध्ये मिर्नी-नेस्टोर जोडीने बाजी मारली.
दुसऱ्या सेटमध्येही ६-६ अशी बरोबरी झाल्यावर मिर्नी-नेस्टोर जोडीला सामना जिंकण्यासाठी संधी होती, पण भूपती-बोपण्णा जोडीने शर्थीचे प्रयत्न केले आणि त्यामध्ये त्यांना यशही मिळाले. टायब्रेकर जिंकत भूपती-बोपण्णा जोडीने सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. दुसरा सेट जिंकल्यावर मनोबल वाढलेल्या भूपती-बोपण्णा जोडीने तिसरा सेट १०-५ असा खिशात टाकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.   

Story img Loader