भारताच्या महेश भूपतीने आपला फ्रेंच साथीदार मायकेल लॉड्राच्या साथीने खेळताना दुबई टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. या बिगरमानांकित जोडीने चुरशीच्या लढतीत तृतीय मानांकित रॉबर्ट लिंड्स्टेड आणि नेनांद झिम्नोजिक जोडीवर ७-६ (६), ७-६ (६) अशी मात केली. यंदाच्या हंगामातील भूपतीचे हे पहिलेच जेतेपद आहे. या स्पर्धेत भूपतीने हे पाचवे जेतेपद संपादन केले आहे. विशेष म्हणजे पाचही वेळा त्याने विभिन्न साथीदारांसह खेळताना जेतेपद पटकावले आहे. १९९८मध्ये त्याने लिएण्डर पेससह तर २००४ मध्ये फॅब्रिस सॅनटोरोच्या साथीने जेतेपदाची कमाई केली होती. याचप्रमाणे २००८मध्ये मार्क नॉवेल्स तर २०१२मध्ये रोहन बोपण्णासोबत खेळताना त्याने जेतेपद नावावर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा