महेश भूपती आणि बहामाच्या डॅनियल नेस्टर या जोडीने मियामी टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. भूपती-नेस्टर जोडीने रिचर्ड गॅस्क्वेट आणि रॉजर वॉसेलिन या जोडीला चुरशीच्या लढतीत ७-६ (३), ६-३ असे नमवले. पुढील फेरीत या जोडीचा मुकाबला स्पेनच्या निकोलस अल्माग्रो आणि ऑस्ट्रियाच्या ऑलिव्हर मारचशी होणार आहे. लिएण्डर पेस आणि माइकेल लॉड्रा या सातव्या मानांकित जोडीने जर्मनीच्या ख्रिस्तोफर कास आणि फिलीप कोहलश्रायबर जोडीवर ६-३, ७-५ असा विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. दरम्यान बिगरमानांकित खेळाडू सोमदेव याने जागतिक क्रमवारीतील ८० वा मानांकित खेळाडू एडवर्ड रॉजर व्हेसेलीन याला ४-६, ६-४, ७-५ असे नमवले. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्यासाठी सोमदेव याला सहा वेळा ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या जोकोवीच याच्याशी खेळावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा