Bhupinder Singh revealed that MS Dhoni was appointed captain of the Indian team: महेंद्रसिंग धोनी हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. २००७ मध्ये कर्णधार म्हणून निवड झाल्यापासून, धोनीने भारताला २००७ चा टी-२० विश्वचषक, २०११चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसह तीन आयसीसी विजेतेपद मिळवून दिले. २००७ मध्ये एमएस धोनीला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले होते, जेव्हा टीमचे वरिष्ठ खेळाडू भारतीय सेटअपमधून बाहेर होते.

एमएस धोनीला कर्णधार बनवण्याचा हा निर्णय योग्य ठरला. कारण भारतीय क्रिकेटने धोनीच्या नेतृत्त्वाखाी नवी उंची गाठली. २००७ मध्ये एमएस धोनीला कर्णधार का करण्यात आले होते, याबाबत आता एक खुलासा करण्यात आला आहे. हा खुलासा माजी भारतीय निवडकर्ता भूपिंदर सिंग यांनी केला आहे.

Raju Parve resigned from Umred constituency and joined Bharatiya Janata Party
माजी आमदार राजू पारवेंचे पक्षबदल, लोकसभेत शिवसेनेत, विधानसभेत भाजपमध्ये!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Amar Kale says our fight is not with Sumit Wankhede or Dadarao Keche fight is with Devendra Fadnavis
वर्धा : ‘माझी लढत देवेंद्र फडणवीस यांच्याशीच’ या खासदारांच्या वक्तव्याने…
appasaheb jagdale
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या ! आप्पासाहेब जगदाळे यांनी दिला आमदार दत्तात्रय भरणेंना पाठिंबा
In Akola vanchit Bahujan Aghadi Zeeshan Hussain application withdrawn from election
वंचितला मोठा धक्का…अधिकृत उमेदवाराची माघार…आता काँग्रेसला…
India Must be Missing Rahul Dravid Pakistan Former Cricketer Basit Ali Slams Gautam Gambhir and IPL Like Tactics After Whitewashed
IND vs NZ: “आज भारताला द्रविडची आठवण येत असेल…”, पाकिस्तानी माजी खेळाडूने व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला सुनावलं, IPL रणनितीवर उपस्थित केले प्रश्न
ajit ranade resigned
गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा राजीनामा
Eknath Shinde on Mahim
Eknath Shinde : माहीममध्ये महायुतीचा पाठिंबा कोणाला? सदा सरवणकरांना समर्थन की मनसेला साथ? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

म्हणून धोनीला कर्णधार बनवण्यात आलं होतं –

माजी भारतीय निवडकर्ता भूपिंदर सिंग यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “संघातील एक आवडता पर्याय असण्याव्यतिरिक्त, तुम्ही खेळाडूचे क्रिकेट कौशल्य, देहबोली, समोरून नेतृत्व करण्याची क्षमता आणि मॅन मॅनेजमेंट कौशल्ये पाहता. धोनीचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, देहबोली, तो इतरांशी कसा बोलतो हे पाहिले आणि त्याला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या.”

हेही वाचा – ENG vs AUS: ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत विक्रमांचा पाऊस, कर्णधार पॅट कमिन्स ‘या’ खास क्लबमध्ये झाला सहभागी

एमएस धोनी कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर भारतीय संघाने द्विपक्षीय मालिकेत चांगली कामगिरी केली आहे, परंतु संघाला आतापर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. धोनीनंतर कर्णधार बनलेल्या विराट कोहलीने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले, पण त्याच्या नेतृत्वाखाली संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले.

हेही वाचा – ENG vs AUS: पहिल्या दिवशी डाव घोषित करणे इंग्लंडच्या अंगलटी, बेन स्टोक्सने सांगितली काय होती योजना?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप विजेतेपदापासून वंचित राहिला. त्याच वेळी, २०२२च्या टी-२९ विश्वचषक स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाला होता. यंदाचा एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. तसेच भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला १० वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.