वेस्ट इंडिजविरुद्धच्या धरमशाला येथे झालेल्या एकदिवसीय लढतीत शतक झळकावत दिमाखदार पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. गोलंदाजांमध्ये युवा भुवनेश्वर कुमारने कारकिर्दीत पहिल्यांदाच अव्वल दहामध्ये स्थान पटकावले आहे.
चुकांतून शिकत विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध धरमशाला येथे १२७ धावांची शानदार खेळी केली. हे त्याच्या कारकिर्दीतील २० वे शतक होते. या खेळीसह कोहलीने क्रमवारीत हशीम अमलाला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए बी डीव्हिलियर्स अव्वल स्थानी आहे.

Story img Loader