Bhuvneshwar Kumar is likely to return to the Indian team after the World Cup 2023: सध्या भारतीय संघ मायदेशात खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेत व्यस्त आहे. या विश्वचषक स्पर्धेनंतर लगेचच टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेत संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असून त्यात वेगवान गोलंदाजांचाही समावेश असेल हे निश्चित. अशा परिस्थितीत टीम इंडियात पुन्हा एकदा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरिष्ठ गोलंदाजांच्या अनुपस्थितीत भुवी टीम इंडियाच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करू शकतो. भुवनेश्वर गेल्या एक वर्षापासून भारतीय संघाबाहेर आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका त्याच्यासाठी मोठी संजीवनी ठरू शकते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “निवडकर्ते वरिष्ठ गोलंदाजांना विश्रांती देऊ शकतात. अशा स्थितीत भुवनेश्वर कुमारसारख्या अनुभवी वेगवान गोलंदाजाची आपल्याला गरज आहे. त्याला पुन्हा बोलावले जाऊ शकते.”

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये भुवनेश्वरची शानदार कामगिरी –

नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये भुवनेश्वर कुमारने चमकदार कामगिरी केली. त्याने ७ सामन्यात ९.३१ च्या उत्कृष्ट सरासरीने १६ विकेट घेतल्या, ज्यामध्ये एका सामन्यातील पाच विकेट्सचा समावेश होता. या कालावधीत त्याने ५.८४च्या इकॉनॉमीने धावा खर्च केल्या. अशा स्थितीत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील कामगिरीही भुवनेश्वरसाठी संजीवनी ठरू शकते.

हेही वाचा – Glenn Maxwell: “आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळी”; भारताच्या माजी खेळाडूकडून मॅक्सवेलच्या द्विशतकाचे कौतुक

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतासाठी खेळला होता शेवटचा सामना –

भुवनेश्वर कुमार २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. त्यानंतर तो नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून टी-२० मालिका खेळला. मात्र यानंतर त्याला संघात स्थान मिळवता आले नाही. भुवनेश्वर भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. आतापर्यंत त्याने २१ कसोटी, १२१ एकदिवसीय आणि ८७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ६३, एकदिवसीय सामन्यात १४१ आणि टी-२० मध्ये ९० विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhuvneshwar kumar is likely to return to the indian team for the five match t20i series against australia vbm