Bhuvneshwar Kumar Hattrick in Syed Mushtaq Ali Trophy: भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेल्या भुवनेश्वर कुमारने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत चमकदार कामगिरी केली आहे. काही दिवसांपूर्वीच आयपीएल लिलावादरम्यान त्याला मोठ्या किमतीत खरेदी करण्यात आले होते आणि आता त्याने हॅटट्रिक घेत खळबळ उडवून दिली आहे. भुवीची टी-२० क्रिकेटमधील ही पहिली हॅट्ट्रिक आहे. या हॅट्ट्रिकसह भुवनेश्वर कुमारने आपल्या गोलंदाजीची चमक दाखवून दिली आहे.

उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये झारखंडविरुद्ध हॅटट्रिक घेतली. भुवनेश्वर कुमारने १७ व्या षटकात हा पराक्रम केला. या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर भुवनेश्वर कुमारने लागोपाठ विकेट घेतल्या आणि एकही धाव दिली नाही. सामन्याच्या १७व्या षटकात भुवनेश्वर कुमार गोलंदाजीसाठी आला तोपर्यंत झारखंडच्या संघाने ११६ धावा केल्या होत्या. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने ११ धावा करणाऱ्या रॉबिन मिंजला बाद केले. त्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने खाते न उघडताच बाळकृष्णला माघारी धाडले. यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने विवेकानंद तिवारीला बाद केले. त्यालाही आपले खाते उघडता आले नाही.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Dabur Vs Patanjali
Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
institutions values and provisions in indian constitution
संविधानभान : आधुनिक भारताची संस्थात्मक उभारणी
Brigadier Amitabh Jha acting UN peacekeeping force commander passes away
व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्माचे पत्रकार परिषदेत ड्रेसिंग रूममधील मतभेदांवर स्पष्ट उत्तर, दुसऱ्या कसोटीपूर्वी म्हणाला…

प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेश संघाने २० षटकांत १६० धावा केल्या. संघाकडून एकही अर्धशतक झाले नाही, पण रिंकू सिंगने नक्कीच २८ चेंडूत ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यानंतर झारखंड संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरला, तेव्हा संपूर्ण संघ केवळ १५० धावाच करू शकला आणि सर्वबाद झाला. अशाप्रकारे उत्तर प्रदेशने हा सामना १० धावांनी जिंकला. एकेकाळी झारखंडचा संघ विजयाच्या दिशेने जात असल्याचे दिसत होते, मात्र भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीनंतर झारखंडचा संघ बॅकफूटवर गेला.

हेही वाचा – IND vs AUS: डे-नाईट कसोटी सामना किती वाजता सुरू होणार? कसं असणार दिवसाचं वेळापत्रक; वाचा लाईव्ह स्ट्रीमिंग डिटेल्स

भुवनेश्वर कुमारसाठी १० कोटींची बोली

जवळपास १० वर्षे आयपीएलमध्ये SRH म्हणजेच सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा संघ यावेळी बदलला आहे. गेल्या वर्षापर्यंत त्याला हैदराबादकडून खेळताना ४.२० कोटी रुपये मिळत होते. मात्र यावेळी त्याच्यावर तगडी बोली लागली. जेव्हा त्याचे नाव २ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत पुकारले गेले तेव्हा मुंबई इंडियन्सने त्याच्यावर पहिली बोली लावली. यानंतर, लखनौ आणि मुंबई यांच्यातील बराच काळ बोली लावण्याची स्पर्धा होती. हळूहळू त्याच्या किमतीने १० कोटींचा टप्पा ओलांडला. यानंतर, आरसीबीने अचानक लिलावाच्या मैदानात उडी घेतली आणि १०.7७५ कोटींना त्याला संघात सामील केले.

Story img Loader