भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने वर्षभरातील सर्वोत्तम लोकप्रिय खेळाडूचे पारितोषिक पटकाविले. त्याने डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) व मिचेल जॉन्सन (ऑस्ट्रेलिया) यांना मागे टाकून हा मान मिळविला. हा मान मिळविणारा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे.
यापूर्वी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांना हा मान मिळाला आहे. श्रीलंकेच्या कुमार संगकारा याला २०११ व २०१२ या दोन वर्षांकरिता हा पुरस्कार मिळाला होता.
भुवनेश्वर कुमारने सांगितले की, ‘‘माझ्यावर अलोट प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांचा मी शतश: ऋणी आहे. माझ्या वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर हा पुरस्कार निश्चित मिळाला नसता. माझ्या चाहत्यांनी दिलेल्या मतांमुळेच मला हा मान मिळाला आहे. माझ्या कारकिर्दीचे श्रेय माझ्या आई-वडिलांना तसेच माझ्या प्रशिक्षकांना द्यावे लागेल. त्यांचा पाठिंबा आणि सहकार्यामुळेच मी हे शिखर गाठू शकलो.’’
भुवनेश्वरला लोकप्रिय खेळाडूचे पारितोषिक
भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने वर्षभरातील सर्वोत्तम लोकप्रिय खेळाडूचे पारितोषिक पटकाविले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-11-2014 at 05:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhuvneshwar kumar wins lg peoples choice award