Mumbai Indians IPL 2024: आयपीएल २०२४ सुरू होण्यासाठी फक्त ५ दिवस शिल्लक आहेत. पण तत्त्पूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका आयपीएलचे सुरूवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. खुद्द श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेदरम्यान हा वेगवान गोलंदाज जखमी झाला होता. त्यामुळे तो तिसऱ्या सामन्यातूनही बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ IPL 2024 मध्ये पहिला सामना २४ मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार आहे. मुंबई इंडियन्सने IPL 2024 पूर्वीच रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

– quiz

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दोन सामने झाले असून मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. मात्र मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाचा युवा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाला दुखापत झाली. यामुळे संपूर्ण मालिकेतूनही बाहेर पडला आहे आणि पुनर्वसनासाठी श्रीलंकेला परतणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी करताना दिलशान मदुशंकाच्या डाव्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली. एमआरआय स्कॅनमध्ये याबाबत माहिती समोर आली.

दिलशान मदुशंकाची दुखापत मुंबई इंडियन्ससाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. मुंबई संघाने त्याला ४.६० कोटी रुपयांना खरेदी केले. त्याची मूळ किंमत फक्त ५० लाख रुपये होती. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे गोलंदाजाला एक ते दोन आठवडे विश्रांती घ्यावी लागते. अशा परिस्थितीत आयपीएल २०२४ च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणे त्याच्यासाठी नक्कीच कठीण आहे.

आयपीएल २०२४ साठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (जीटीकडून ट्रेड आणि संघाचा कर्णधार), टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, विष्णू विनोद, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, नेहल वढेरा, पियुष चावला, गेराल्ड कोएत्झी, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big blow for mumbai indians as dilshan madushanka miss initial match of ipl 2024 due to injury bdg
Show comments