नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जुलै महिन्यात भारताचा दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा कार्यक्रम ठरला होता. त्यानुसार भारतीय संघ तीन कसोटी, सात एकदिवसीय सामने आणि दोन ट्वेन्टी-२० सामने खेळणार होता. पण नोव्हेंबरमध्येच वेस्ट इंडिजने भारताला कॅरेबियन बेटांवर खेळण्याचे निमंत्रण पाठवले तसेच  जानेवारीत होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी फारच कमी वेळ मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना हारून लोरगट यांच्याशी भारताचे अनेक वेळा खटके उडाले होते. लोरगट आता क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्याला कात्री लागण्याची शक्यता अधिक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा