पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टने एक डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीमधील विविध गटात तीस हजार खेळाडूंनी भाग घेतला आहे. मुख्य मॅरेथॉन व अर्धमॅरेथॉनमध्ये शंभर खेळाडू सहभागी असतील. या शर्यतीच्या विजेतेपदासाठी प्रामुख्याने केनिया व इथिओपियाच्या धावपटूंमध्ये चुरस राहील अशी अपेक्षा आहे.
मुख्य मॅरेथॉन शर्यतीस खंडोजीबाबा चौक (संभाजी पूल) येथे सकाळी ६-४५ वाजता प्रारंभ होणार आहे. त्याच ठिकाणाहून त्यानंतर पाच मिनिटांनी पुरुष व महिलांची दहा किलोमीटर अंतराची शर्यत सोडण्यात येणार आहे. व्हीलचेअर गट, १५ व १८ वर्षांखालील मुले व मुली, चॅरिटी दौड या गटाच्या शर्यती सकाळी ७-३० ते ८ या वेळेत सोडण्यात येतील. याच चौकात सकाळी ६-५० ते ७-३० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. या शर्यतीबरोबर आयोजित करण्यात आलेली पुरुष व महिला गटाची अर्धमॅरेथॉन शर्यतीस खडकी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप येथून सकाळी ७-२० वाजता प्रारंभ होईल.  मुख्य मॅरेथॉन शर्यतीच्या मार्गाची आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे प्रतिनिधी वाँग टाँग यांनी नुकतीच पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले.
मुख्य मॅरेथॉन व अर्ध मॅरेथॉन शर्यतींचा पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सकाळी दहा वाजता नेहरू स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा