आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वी, मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने निवृत्तीची घोषणा केली. पोलार्डने आयपीएल २०२३ रिटेन्शन डेडलाइनच्या काही तास आधी निवृत्ती जाहीर केली होती. पोलार्डला मुंबईत कायम ठेवलं जाणार नाही हे आधीच माहीत होतं, त्यामुळेच त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर पोलार्डने मुंबई फ्रँचायझीशी बोलल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. त्याच्यानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्माने एक इंस्टाग्रामवर पोस्ट करुन पोलार्डबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलार्डच्या निवृत्तीच्या निर्णयावर आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची प्रतिक्रिया आली आहे. रोहितने इंस्टाग्रामवर पोलार्डसाठी एक फोटो शेअर करतानान पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, हा खेळाडू मुंबई इंडियन्ससाठी नेहमीच एक खरा दिग्गज राहिला आहे, पोलार्डने मोठा प्रभाव पाडला आहे, तो नेहमीच मुंबईसाठी मनापासून खेळला आहे. पोलार्ड आणि स्वतःचा फोटो शेअर करताना रोहितने या गोष्टी सांगितल्या. रोहितने पोस्टच्या शेवटी म्हटले आहे की, तो त्याला खूप मिस करेल. निवृत्तीच्या निर्णयानंतर पोलार्ड मुंबई संघाशी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जोडला जाईल.

वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तथापि, तो अजूनही मुंबई इंडियन्सचा भाग असेल कारण संघ मालकांनी त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या अनुभवी खेळाडूची मुंबई इंडियन्सने फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएल २०२३ पासून तो ही जबाबदारी सांभाळणार आहे. एवढेच नाही, तर तो एमआय एमिरेट्सकडून खेळतानाही दिसणार आहे.

किरॉन पोलार्डची आयपीएल कारकीर्द –

पोलार्ड २०१० पासून आयपीएलशी जोडला गेला आहे. त्याने लीगमधील १८९ सामन्यांमध्ये २८.६७ च्या सरासरीने आणि १४७.३२ च्या स्ट्राइक रेटने ३४१२ धावा केल्या. यामध्ये १६ अर्धशतकांचा समावेश आहे. पोलार्डने फलंदाजीच्या जोरावर मुंबईला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला. याशिवाय गोलंदाजीतही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलार्डने आयपीएलमध्ये एकूण ६९ विकेट घेतल्या आहेत. ४४ धावांत चार बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. आयपीएलमध्ये पोलार्डची अर्थव्यवस्था ८.७९ होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big man big impact and always played with heart rohit sharma on kieron pollard ipl retirement vbm