Babar Azam to quit from captaincy: विश्वचषकादरम्यान एक मोठी बातमी येत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मायदेशात परतताच कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकतो. २०२३च्या विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. पाकिस्तानी मीडिया सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त आहे की, क्रिकेट बोर्ड आणि माजी क्रिकेटपटूंच्या वागणुकीमुळे निराश झालेला बाबर आझम भारतातून पाकिस्तानला परतल्यानंतर एकदिवसीय आणि टी२० संघाचा राजीनामा देऊ शकतात. पाकिस्तानचा संघ अजूनही विश्वचषक २०२३ मध्ये उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे, परंतु पात्र होण्याची शक्यता खूपच धूसर आहे.
विश्वचषक २०२३ मध्ये खराब कामगिरी
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात पाकिस्तानी संघाची कामगिरी काही खास नव्हती, त्यामुळे हा संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळेच बाबर आता कर्णधारपद सोडू शकतो. सूत्रांकडून अशीही बातमी समोर येत आहे की, कसोटी फॉरमॅटचे कर्णधारपद हे त्याच्याचकडे ठेवले जाऊ शकते. विश्वचषकात पाकिस्तानने आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यांत आठ गुण झाले आहेत. संघाचा शेवटचा साखळी सामना आज (११ नोव्हेंबर) इंग्लंडविरुद्ध होणार आहे. उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी, संघाला मोठा विजय नोंदवावा लागेल, कारण न्यूझीलंडची निव्वळ धावगती +०.७४३ आहे तर पाकिस्तानची +०.०३६ आहे.
जवळच्या व्यक्तींचा सल्ला घ्या
पाकिस्तानी माध्यमांनुसार, बाबर आझमने त्याच्या जवळच्या लोकांशी आणि पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू रमीझ राजा यांच्याशी त्याच्या कर्णधारपदाबद्दल चर्चा केली आहे. आपल्या जवळच्या लोकांशी सल्लामसलत केल्यानंतर बाबर आझम कर्णधारपदावरून पायउतार होणार की नाही याचा निर्णय घेईल. मात्र, त्याच्या जवळच्या काही लोकांनी त्याला खेळाच्या तीनही फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडण्यास सांगितले आहे. २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत संघाच्या सततच्या खराब कामगिरीनंतर तो माजी क्रिकेटपटूंच्या निशाण्यावर आहे.
बाबरने स्वतः ‘हे’ वक्तव्य केले आहे
इंग्लंडविरुद्ध पाकिस्तान संघाच्या शेवटच्या साखळी सामन्याआधी, जेव्हा बाबर आझमला त्याच्या कर्णधारपदाचा निर्णय कधी घेणार असे विचारण्यात आले तेव्हा त्याने सूचक विधान केले. त्याने सांगितले की, “पाकिस्तानला परतल्यानंतर तो मी यावर योग्य निर्णय घेईन.” त्याने कर्णधार म्हणून घेतलेले निर्णय चुकीचे होतेच पण २०२३चा विश्वचषक त्याच्या वैयक्तिक कामगिरीबाबतही फारसा काही खास नव्हता. त्याने आठ सामन्यात केवळ २८२ धावा केल्या आहेत. येत्या काही दिवसात बाबर पाकिस्तानी संघाचा कर्णधार राहणार की नाही हे लवकरच कळेल.