Babar Azam on Pakistan Team: एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर बाबर आझमकडून पाकिस्तानचे कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते. त्याच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी घेण्यासाठी तीन नावे चर्चेत आहेत. त्याचा सहकारी मोहम्मद रिझवान या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याचबरोबर शाहीन आफ्रिदी आणि माजी कर्णधार सरफराज अहमद याला देखील पाकिस्तान संघाचे कर्णधारपद मिळू शकते. वर्ल्डकपनंतर लगेचच पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. २०२४ टी२० विश्वचषक आणि २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही संघाला नियोजन करण्याची गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये स्पष्ट एकमत आहे की बाबरला स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती आणि तो कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे आणखी चार साखळी सामने बाकी आहेत. जर त्यांनी ते चारही सामने जिंकले तर ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकतात.

एका पाकिस्तानी जिओ टीव्ही वृत्तवाहिनीने सांगितले की, “पाकिस्तानने एखादा चमत्कार घडवून आणला तरच ते या विश्वचषकातील त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकतील आणि उपांत्य फेरीत पोहचतील. बाबरला कर्णधार म्हणून पुढे जाण्याची ही कदाचित ही शेवटची संधी असू शकते. तरीही त्यांच्याकडून कसोटी संघाचे कर्णधारपद हिरावून घेतले जाऊ शकते.”

सूत्राने सांगितले की, “बाबरच्या विरोधात तयारी करण्यात आली आहे आणि जर संघ विश्वचषक उपांत्य फेरीत न खेळता मायदेशी परतला तर तो कर्णधारपदाचा राजीनामा देखील देऊ शकतो. “बाबरसाठी हे संपले आहे कारण त्याला कर्णधार म्हणून बेलगाम हक्क आणि अधिकार देण्यात आले आहेत. तसेच, महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तान संघात त्याच्या आवडीचे खेळाडू आहेत. त्याचा अधिकार कमी करण्याचा कधीही प्रयत्न झाला नाही आणि म्हणूनच आता त्याला आशिया कप आणि विश्वचषकातील पराभवासाठी पूर्णपणे जबाबदार धरले जात आहे.”

हेही वाचा: World Cup: “तुम्ही तुमची माणसे भरली…”पाकिस्तानच्या पराभवानंतर पीसीबी प्रमुखांच्या चुकांवर वसीम अक्रम संतापला

पीसीबीच्या एका सूत्राने त्या वृत्तवाहिनीवर बोलताना सांगितले की, “आशिया चषक आणि विश्वचषकासाठी, माजी कर्णधार मिसबाह-उल-हक आणि मोहम्मद हाफीज यांनी भारतातील स्पर्धेसाठी काही बदल करण्याचा सल्ला देऊनही, बाबरला त्याने मागितलेले सर्व १८ खेळाडू मिळाले. मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हकनेही त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता.”

सूत्राने पुढे असेही सांगितले की, “पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी मिसबाह, हाफीज आणि इतर काही माजी खेळाडूंच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले ज्यांचा त्यांनी सल्ला घेतला कारण, बाबरला विश्वचषकासाठी संघात बदल नको होता आणि यावर तो ठाम होता.” मिसबाहने त्या वृत्तवाहिनीवर पुष्टी केली की, “त्याने बाबरला मिस्ट्री स्पिनर अबरार अहमदचा वर्ल्ड कपमध्ये समावेश करण्याचा सल्ला दिला होता, परंतु बाबरने नकार दिला आणि केवळ प्रवासी राखीव म्हणून त्याला भारतात घेऊन जाण्यास तयार झाला.”

हेही वाचा: World Cup 2023: PCB प्रमुखांनी पाकिस्तानच्या माजी खेळाडूंची घेतली भेट, विश्वचषकासंदर्भात झाली महत्त्वाची चर्चा

“विशेष म्हणजे, सरफराज, शाहीन, रिझवान आणि शान मसूद यांच्यासह संभाव्य उमेदवारांच्या लॉबीने कर्णधारपदी आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला सुरुवात केली आहे. बोर्ड आता कसोटी, एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटसाठी स्वतंत्र कर्णधार ठेवण्याची योजना आखत आहे. फक्त नावाची घोषणा होऊ शकते. “सरफराजला पुन्हा कसोटी आणि एकदिवसीय संघांचे कर्णधारपद मिळू शकते, तर शाहीनला टी२०चे कर्णधार बनण्याची संधी मिळू शकते,” पीसीबीच्या सूत्राने सांगितले. सरफराज सध्या विश्वचषक संघाचा भाग नाही.

“मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न, मोर्ने मर्क्ले, अँड्र्यू पुटिक आणि व्यवस्थापक रेहान उल हक यांच्या सपोर्ट स्टाफचीही चौकशी सुरू असून त्यांना विश्वचषकानंतर पद सोडण्यास सांगितले जाईल. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी दौर्‍यानंतर आणि विश्वचषक स्पर्धेनंतर न्यूझीलंडमधील पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी पाकिस्तानकडे नवीन प्रशिक्षक कर्मचारी आणि कर्णधार असण्याची शक्यता आहे,” असेही पाकिस्तान बोर्डाच्या सूत्राने स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले की, “बोर्ड ड्रेसिंग रूममधील काही मतभेद आणि विवादांच्या लीक झालेल्या अहवालांवर देखील खूश नव्हते, जे पीसीबीने सोमवारी नाकारले. २०१९च्या उत्तरार्धात बाबरला सुरुवातीला टी२० कर्णधार बनवण्यात आले होते परंतु २०२१ पर्यंत त्याने तीनही फॉरमॅटचे कर्णधारपद स्वीकारले होते.”