Virat Kohli Break From White Ball: विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा विराट कोहलीने भारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍याआधीच एक मोठा निर्णय घेतला असल्याचे समजतेय. इंडियन एक्सस्प्रेसच्या माहितीनुसार विराट कोहलीने १० डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेआधी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याचे सांगितले आहे. विराट कोहलीने बीसीसीआयला याबाबत कळवले आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडिया, तीन टी-20 आंतरराष्ट्रीय, तीन एकदिवसीय सामने आणि त्यानंतर दोन कसोटी सामने खेळणार आहे. टी २० सामने आणि एकदिवसीय सामने खेळणार नसल्याचे कोहलीने स्पष्ट केले असले तरी यात कसोटी सामन्यांबाबत भाष्य केलेले नाही त्यामुळे कदाचित कोहली कसोटी सामन्यांसाठी मैदानांत उतरू शकतो असे समजतेय. २६ डिसेंबरपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

Virat Kohli knows he is past his best and that will hurt David Lloyd statement after his poor test form
Virat Kohli : ‘विराट कोहलीचा काळ गेला…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘वयाबरोबर प्रत्येकजण…’
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kapil Dev Statement on Rohit Sharma Virat Kohli Test Retirement Said They know when to call time
Kapil Dev On Rohit-Virat: “ते दोघं मोठे खेळाडू, त्यांना वाटेल तेव्हा…”, कपिल देव यांचं रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
Just tell Virat Kohli you have a match against Pakistan Shoaib Akhtar advice to India Champions Trophy vbm
Champions Trophy 2025 : ‘त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध मॅच आहे…’, विराटला फॉर्ममध्ये आणण्यासाठी शोएब अख्तरने भारताला दिला खास मंत्र
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
Rohit Sharma and Virat Kohli included in India squad for Champions Trophy ODIs
रोहित, विराटच्या समावेशाची शक्यता; चॅम्पियन्स करंडकासाठी राहुल, शमी, जडेजाबाबत संदिग्धता

भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समिती येत्या काही दिवसांत तिन्ही फॉरमॅटसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. कोहलीने घरच्या मैदानावर शानदार विश्वचषक खेळला होता ज्यात त्याने ११ डावांमध्ये ७६५ धावा केल्या, ज्यात तीन शतकांचा समावेश होता. त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरवण्यात आले.

इंडियन एक्सस्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “त्याने (कोहली) बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना कळवले आहे की त्याला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांतीची आवश्यकता आहे आणि व्हाईट बॉल क्रिकेट खेळण्यासाठी तो कधी तयार होईल हे कळवण्यासाठी तो त्यांच्याशी संपर्क साधून कळवेल. या क्षणी त्याने बीसीसीआयला कळवले आहे की तो रेड-बॉल क्रिकेट खेळणार आहे, याचा अर्थ तो दक्षिण आफ्रिकेतील दोन कसोटी सामन्यांच्या संघात निवडीसाठी उपलब्ध आहे.”

हे ही वाचा<< “त्या लोकांची दूरदृष्टी..”, सुनील गावसकरांची ‘सचिन’साठी खास पोस्ट; तेंडुलकरची ‘कमेंट’ गुगली ठरली लक्षवेधी

प्राप्त माहितीनुसार, कोहली सध्या लंडनमध्ये सुट्टीवर आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो सलग सामने खेळत आहे. शेवटच्या वेळी कोहलीने सप्टेंबरमध्ये विश्वचषकापूर्वी विश्रांती घेतली होती, कोहली व रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आली होती.

Story img Loader