What is the latest update on Jasprit Bumrah’s Return: स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. तो भारताकडून शेवटचा सामना सप्टेंबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. तो टी२० सामना होता. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहला बाहेर जावे लागले. मात्र, आता गोलंदाजाच्या पुनरागमनाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. बुमराह विश्वचषकापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतून मैदानात परत येऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. वर्ल्डकप यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे, तर भारताचा सामना ऑगस्टमध्ये आयर्लंडशी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाठीच्या दुखापतीपासून मुक्त होण्यासाठी बुमराहने मार्चमध्ये शस्त्रक्रिया केली आणि त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (ANCA) मध्ये त्याच्या फिटनेसवर बरेच कष्ट घेण्यात आले. न्यूज१८च्या रिपोर्टनुसार, बुमराह ऑगस्टमध्ये आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. बुमराहचा फिटनेस चांगला होत असून तो चांगली प्रगती करत आहे. आयर्लंड मालिकेनंतर भारतीय संघाला आशिया चषकही खेळायचा आहे. आशिया चषक ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने न्यूज१८शी बोलताना पुढे सांगितले की, “भारतीय क्रिकेट संघासाठी ही चांगली चिन्हे आहेत. दुखापतीमुळे बराच काळ बाहेर राहिल्यानंतर बुमराहला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळेल. जर सर्व काही ठीक झाले तर बुमराह पुन्हा मैदानात आपल्याला दिसेल त्याचा फिटनेस उत्तम आहे, त्यामुळे तो पुनरागमन करू शकतो.”

हेही वाचा: R. Ashwin: WTC फायनलनंतर अश्विनने टीम इंडियाचे दुःखद वास्तव केले उघड, म्हणाला, “संघातील खेळाडू आधी मित्र होते आता केवळ…”

बुमराह एन.सी.ए. प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि नितीन पटेल यांच्या देखरेखीखाली आहे. नितीन क्रीडा विज्ञान आणि औषध विभागाचे प्रमुख आहेत. बुमराहच्या पुनर्वसनावरही एनसीएचे फिजिओ एस. रजनीकांत हे त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. एका सूत्राने सांगितले की, “कोणत्याही संघात बुमराहचे महत्त्व सर्वांनाच समजते. मग तो भारतीय संघ असो किंवा आयपीएलमधील मुंबई इंडियन्स.

बुमराह WTC फायनल खेळू शकला नाही

जसप्रीत बुमराह आयपीएल २०२३चा भाग नव्हता. त्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून टी२० मध्ये शेवटचा सामना खेळला होता. बुमराहला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठीही संघात स्थान मिळवता आले नाही. बुमराहसोबत श्रेयस अय्यरही संघात पुनरागमन करण्याच्या विचारात आहे.

हेही वाचा: Indonesia open: ४१ वर्षानी सात्विक-चिराग जोडीने रचला इतिहास! जगज्जेत्यांना हरवून इंडोनेशिया ओपनच्या विजेतेपदावर कोरले नाव

बुमराहची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

२९ वर्षीय बुमराहने आतापर्यंत ३० कसोटी, ७२ वन डे आणि ६० टी२० सामने खेळले आहेत. बुमराहने कसोटीत २२च्या सरासरीने १२८ विकेट्स घेतले आहेत. वनडेमध्ये त्याने ४.६३च्या इकॉनॉमीने १२१ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने टी२० मध्ये ६.६२च्या उत्कृष्ट इकॉनॉमीसह ७० विकेट्स घेतल्या आहेत. एवढेच नाही तर बुमराहचा आयपीएलमधील रेकॉर्डही अप्रतिम आहे. बुमराहने आयपीएलमध्ये खेळलेल्या १२० सामन्यांमध्ये ७.३९च्या इकॉनॉमीसह १४५ विकेट्स घेतल्या आहेत. बुमराह सध्या टीम इंडियातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याचे पुनरागमन रोहित सेनेसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big update on jasprit bumrahs can return team india will play ireland odi series before world cup 2023 avw
Show comments