आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(आयसीसी) विशेष पंचांच्या यादीत आता पंच बिली बाउडेन यांचाही समावेश करण्यात आला आहे.
न्यूझीलंड क्रिकेट पंचांच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यामुळे यावर्षाच्या सुरूवातीला पंच टॉनी हील यांनी आयसीसीच्या विशेष पंचांच्या जबाबदारीतून मोकळे होण्याचे ठरविले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आयसीसीच्या विशेष पंचांच्या यादीतील एक जागा रिकामी होती. त्याजागी न्यूझीलंडचेच पंच बिली बाउडेन यांची नियुक्ती करण्याचे ठरविले.  
या बारा जणांच्या विशेष पंचांच्या यादीत बिली बाउडेन यांच्यासह, अलिम डार, कुमार धर्मासेना, स्टिव्ह डाविस, आयन गोउल्ड, रिचर्ड इलिंगवर्थ, रॉड ट्रकर, रिचर्ड कॅटलब्रोव्ह, निगल लांग, ब्रुस आक्सेनफोर्ड, पौल रिइफ्ले आणि मारायस इरास्मुस यांचा समावेश आहे. 

Story img Loader