आय लीग, इंडियन सुपर लीग आणि नुकताच झालेला कुमार विश्वचषक या स्पर्धामुळे भारतातील फुटबॉलप्रेमींना हक्काचे व्यासपीठ दिले. सर्व सोयीसुविधा मिळाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या या स्पर्धामधून या खेळाला नक्की काय मिळाले हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. पण खेळासाठी पूरक सोयीसुविधा नसताना मुंबईतील एक व्यक्ती फुटबॉलप्रेमापोटी एक संस्था स्थापन करतो आणि तीस वर्षांत त्या संस्थेचा वृक्ष अफाट वाढतो. ‘फुटबॉलची प्राथमिक शाळा’ या नावाने ही संस्था ओळखली जाते. आता ही संस्था अकादमी झाली आहे, परंतु खेळाप्रती असलेले तिचे प्रेम कणभरही कमी झालेले नाही. आजही ही अकादमी वर्षांला जवळपास १०००-१२०० विद्यार्थ्यांना फुटबॉलचे मोफत प्राथमिक प्रशिक्षण देते. या अकादमीचे नाव सांगितले तर ती स्थापन करण्यामागचे कारण आपल्या डोळ्यांसमोर चटकन उभे राहते आणि मन हळहळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘बिपिन फुटबॉल असोसिएशन’चे रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्ताने ‘बिपिन फुटबॉल अकादमी’ असे नामकरण करण्यात आले. बिपिन नामक एका सहा वर्षांच्या मुलाला फुटबॉलची असलेली आवड होती. मुंबईत होणाऱ्या रोव्हर्स चषक स्पध्रेला उपस्थिती लावण्याचा त्याचा आग्रह असला तरी काही कारणास्तव त्याचे वडील त्याला स्पध्रेला नेऊ शकले नाहीत. त्यानंतर रुसलेल्या मुलाला दिलेले वचन आणि त्याची पूर्ती करण्याआधीच त्या मुलाचे झालेले निधन ही या स्पध्रेच्या निर्मितीमागची कथा. बिपिनच्या स्मरणार्थ सुरू झालेल्या फुटबॉल अकादमीचा हा प्रवास आजही तितक्याच जिद्दीने सुरू आहे. सुरेंद्र करकेरा यांनी मुलाच्या स्मरणार्थ सुरू केलेली ही अकादमी मुंबईतली पहिली फुटबॉल अकादमी म्हणून ओळखली जाते. फुटबॉलचे पायाभूत कौशल्य येथे शिकवले जाते. विशेष म्हणजे १६ वर्षांखालील मुलांनाच या अकादमीच्या शिबिरात सहभागी होता येते.

गेली ३० वर्षे ही अकादमी मुलांना मोफत फुटबॉल प्रशिक्षण देत आहे. मुलांच्या फुटबॉल साहित्याचा खर्चही ही अकादमी उचलते. या अकादमीने मुंबईला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले. पण कालांतराने व्यावसायिक कौशल्य हाताळण्यात अकादमीला अपयश आल्याने हे शिबीर चालवणे करकेरा यांना अवघड वाटू लागले. अनेक प्रयत्न करूनही प्रायोजक मिळत नसल्याने करकेरा यांना हतबल केले. मात्र फुटबॉलप्रेमापोटी आणि मुलाची आठवण जपण्यासाठी त्यांनी प्रत्येक वेळी नव्या जोमाने उभारी घेतली. पण आजही तोटा सहन करून ते वर्षांतून दोन वेळा शिबिराचे आयोजन करत आहेत. फुटबॉलची नि:स्वार्थ सेवा, हीच बिपिनला खरी श्रद्धांजली असल्याचे ते सांगतात.

गेली ३० वर्षे फुटबॉलसाठी सातत्याने कार्य करत राहणे, ही सोपी गोष्ट नाही. सुरेंद्र करकेरा यांच्या या मोहिमेत हातभार लावल्याचे समाधान आहे. मुंबईच्या फुटबॉलपटूंसाठी बिपिन अकदमी ही प्राथमिक शाळा आहे, असे म्हणायला हवे.   – हरीश राव, महाराष्ट्र फुटबॉल संघाचे माजी प्रशिक्षक

बिपिन फुटबॉल अकादमीमुळे मी खऱ्या अर्थाने एक खेळाडू म्हणून घडलो. महागडय़ा अकादमीत प्रवेश मिळवून फुटबॉल प्रशिक्षण घेण्याची माझी ऐपत नव्हती. त्या वेळी बिपिन अकदमीत मला मोफत फुटबॉल प्रशिक्षण घेता आले. सोबत सर्व साहित्यही दिले जायचे त्यामुळे माझ्यासारख्या गरीब मुलांसाठी हा मोठा आधारस्तंभ होता. या अकादमीचे ऋण मी विसरू शकत नाही.   – स्टीवन डायस, माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू

आर्थिक गणित जुळवण्यात अपयश आल्यामुळे बिपिन असोसिएशन बंद करावे असे कधी कधी वाटायचे. सहा वेळा तशा निर्णयापर्यंतही आलो होतो. मात्र,अनेक खेळाडू, त्यांचे पालक स्वत: दूरध्वनी करून शिबिराबाबत चौकशी करायचे. तेव्हा आपण उभी केलेली चळवळ अशी अर्धवट सोडणे चुकीचे असल्याचे मन मला समजवायचे. खेळाडू व पालकांकडून मिळत असलेल्या या प्रेमामुळेच पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळाली.   – सुरेंद्र करकेरा, बिपिन फुटबॉल अकादमीचे संस्थापक

  • विरार, उल्हासनगर-अंबरनाथ, कांदिवली, चर्चगेट, कुलाबा, मुंबई म्युनिसिपालिटी, अंधेरी आणि कल्याण अशा आठ केंद्रांवर बिपिन फुटबॉल अकादमीचे शिबीर घेतले जाते.
  • मुंबईबाहेरही बिपिन अकादमीने आपले कार्य पोहोचवले आहे. त्यांनी अकोला, दमण आणि मंगलोर या तीन केंद्रांवर शिबिराचे आयोजन केले आहे.
  • बिपिन अकादमीत १६ वर्षे (१९९६ ते २०१२) कालावधीत मुलींसाठीही फुटबॉल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मुलींचा या खेळाकडे असलेला कल पाहता हे शिबीर बंद करण्यात आले. आताही ज्या मुलींना फुटबॉल शिकण्याची इच्छा आहे, त्यांना मुलांसोबत प्रशिक्षण दिले जाते.