Bishan Singh Bedi Dies: महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन झालं आहे. ते ७७ वर्षांचे होते. आज २३ ऑक्टोबर २०२३ ला त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आज त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवताना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात बेदी यांनी घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयाविषयी आपण जाणून घेऊया…

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी आज ज्या पद्धतीने दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमी उत्साहात असतात त्याहून कित्येक पट अधिक ऊर्जा ही पूर्वी पाहायला मिळायची असं तुम्हीही ऐकलं असेल. प्रत्येक सामना हा अटीतटीचा होत असे. १९७८ मध्ये जेव्हा भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी गेला होता, तेव्हा बिशन सिंह बेदी हे कर्णधार होते. यावेळी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाक संघाने रडीचा डाव खेळला होता ज्यावर बिशन सिंह बेदी यांनी न भूतो न भविष्यती अशी प्रतिक्रिया दिली होती.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
parveen babi kabir bedi break up story
“परवीन बाबीने मला सोडलं, कारण मी तिला…”, कबीर बेदी यांचा मोठा दावा; म्हणाले…
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Raj Thackeray On Ramesh Wanjale
Raj Thackeray : “रमेश वांजळे शेवटचं माझ्याशी बोलले”, राज ठाकरेंनी सांगितली आठवण; म्हणाले, “अनेक जण सोडून गेले, पण…”
Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात

१४ चेंडू २३ धावा, पाकिस्तानचा रडीचा डाव

१९७८ मधील पाकिस्तान दौऱ्यात टीम इंडियाने पहिला एकदिवसीय सामना जिंकला होता तर सियालकोटमध्ये झालेला दुसरा सामना जिंकून पाकिस्तानने गुणांची बरोबरी केली होती. तिसरा व निर्णायक सामना हा साहीवाल येथे होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानने पहिली फलंदाजी करताना ४० षटकात ७ बाद २०५ धावा केल्या होत्या तर भारताने ३७.४ षटकापर्यंत दोनच विकेट्स देऊन १८३ धावा केल्या होत्या. भारताला जिंकण्यासाठी १४ चेंडूंमध्ये २३ धावांची गरज होती आणि समोर सरफराज नवाज या हरहुन्नरी गोलंदाजांचे आव्हान होते.

बेदींना राग आला, पाकिस्तानी कर्णधाराकडे गेले आणि..

सरफराज नवाजने यावेळी गोलंदाजी करताना सलग चार वेळा बाउन्सर टाकला होता पण एकाही वेळेस पंचांनी त्याला वाईड बॉल म्हणून घोषित केले नाही. पाकिस्तानी गोलंदाज असा प्रयत्न करत होते की भारतीय फलंदाज इच्छा असून एकही शॉट मारू शकत नव्हते. त्यावेळेस पंच सुद्धा तटस्थ नव्हते. सलग चार वेळा पाकिस्तानकडून एकच चूक होत असल्याचे पाहून भारतीय कर्णधार बेदी भडकून ड्रेसिंग रूमच्या बाहेर आले आणि पाकिस्तानचा कर्णधार मुश्ताक मोहम्मद याला प्रश्न करू लागले, यातुनच त्यांचा वाद सुरु झाला आणि बेदी यांनी रागात हातात आलेला सामना पाकिस्तानला भेट म्हणून देत भारतीय फलंदाज अंशुमन गायकवाड व गुंडाप्पा विश्वनाथ यांना माघारी बोलावून घेतले होते.

हे ही वाचा<< बिशन सिंग बेदी यांना ‘सरदार ऑफ स्पिन’ का म्हटलं जायचं?…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं होतं की जेव्हा पंचांचा निर्णय न जुमानता कर्णधाराने स्वतः प्रतिस्पर्ध्याला हातचा विजय काढून दिला होता. बेदी यांच्या या स्वभावाची व निर्णयाची साहजिकच नंतर प्रचंड चर्चा झाली होती.