कोणतेही काम करताना कायम काम करणाऱ्याची गुणवत्ता पाहिली जाते. क्रिकेटमध्येही मोठे नाव असून चालत नाही, तर प्रतिभावंत खेळाडू असणं महत्त्वाचं असतं. सगळेच क्रिकेट संघ प्रतिभावंत खेळाडूंना संधी देतात, पण पाकिस्तानच्या दानिश कनेरियाला हिंदू असल्याने संघात त्रास दिला जात होता असा गौप्यस्फोट रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने केला. या मुद्द्यावर बोलताना भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे.

नक्की वाचा – …तर हा गुन्हा नाही – रोहित शर्मा

गंभीरने पाकिस्तानवर केली सडकून टीका

“(पाकिस्तानातील हिंदूंना त्रास देणं) हाच पाकिस्तानचा खरा चेहरा आहे. तर दुसरीकडे भारतासारख्या देशात मुस्लीम जनता अल्पसंख्याक असतानाही मोहम्मद अझरूद्दीन दीर्घकाळ भारतीय संघाचा कर्णधार होता. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे स्वत: एक खेळाडू होते. त्यांच्या देशात अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर हे अतिशय लज्जास्पद आहे”, अशी टीका गौतम गंभीर याने केली आहे.

…तर हा गुन्हा नाही – रोहित शर्मा

काय आहे नक्की प्रकरण

“पाकिस्तानच्या संघात बरेच हेवे-दावे केले जातात. पाकिस्तानच्या संघात गुणवत्ता आणि कामगिरी या गोष्टींपेक्षाही जास्त महत्त्व इतर काही गोष्टींना दिले जाते. या गोष्टींसाठी पाकिस्तानचे खेळाडू हाणामारी करायलाही कमी करत नाहीत. पाकिस्तानच्या संघात दानिश कनेरिया हा हिंदू खेळाडू होता. तो हिंदू आहे, म्हणून त्याच्यावर कायम अन्याय करण्यात आला. त्याने संघासाठी अनेक विजय मिळवून दिले. सामने आणि मालिकाही जिंकवून दिल्या. पण तरीही त्याला आपल्याबरोबर जेवताना पाहून पाकिस्तानच्या खेळाडूंना रुचायचे नाही. काहींची तर त्याला मारण्यापर्यंतही मजल गेली होती. अखेर त्या हिंदू खेळाडूने लवकर कारकिर्द संपवली, नाही तर त्याने जास्त काळ संघात राहून पाकिस्तानला विजय मिळवून दिले असते”, असा गौप्यस्फोट शोएब अख्तरने केला होता.

Video : ‘एकहाती कॅच’… स्मिथला बाद करण्यासाठी निकल्सने टिपला भन्नाट झेल

दानिश कनेरियाने काय म्हटलं?

शोएब अख्तरच्या गौप्यस्फोटानंतर दानिश कनेरियानेदेखील याबाबत मौन सोडले. “शोएब अख्तरने सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत खऱ्या आहेत. मी हिंदू आहे म्हणून माझ्याशी न बोलणाऱ्या सर्व खेळाडूंची नावे मी जाहीर करेन. या आधी या विषयावर बोलण्याची माझी हिंमत नव्हती. पण आता मी नक्कीच बोलेन”, असं दानिशने सांगितलं.

Story img Loader