वानखेडेवरील अखेरच्या सामन्यानंतर क्रिकेटसुर्य सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार जाहीर करून संपूर्ण देशातील सचिनरसिकांना सरप्राईज दिल्यानंतर सोशल नेटवर्कींग साईट ट्विटर सचिनमय झालेली दिसली. विविध क्षेत्रातील सन्मानिय व्यक्तिंनी सचिनला भारतरत्न मिळाल्याबद्दल आणि भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या..
रॉजर फेडरर:सचिनची कारकीर्द असाधारण आहे. त्याच्या पुढील प्रवासासाठी माझ्या खूप शुभेच्छा



खिस गेल:सचिनच्या २००व्या आणि अखेरच्या सामन्यातील मी एक भाग होतो, त्याचा खूप आनंद आहे



वीरेंद्र सेहवाग:सचिनने निवृत्तीची घोषणा केल्यापासून माझ्यासाठी हा भावपूर्ण काळ होता. सचिन माझ्यासाठी काय आहे, हे मी सांगू शकत नाही.



हरभजन सिंह:मास्टरला सलाम करुया. माझ्यासाठी तुझ्याशिवाय क्रिकेट पूर्वीसारखे नसेल तू क्रिकेट आहेस. तुझ्या योगदानासाठी धन्यवाद पाजी.



आमीर खान:तुझ्या चाहत्यांना दिलेल्या योगदानासाठी धन्यवाद सचिन. तुझ्यासारखा खेळाडू पुन्हा होणार नाही.



शाहरुख खान: देवाने तुला जी कला दिली त्याचे तू सोने केलेस…इतिहास रचलास. तू तुझ्या साध्या आणि चांगल्या आयुष्याचे चीज केलेस..

Story img Loader