प्रिय रॉजर फेडरर,

स.न.वि.वि

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ट्विट मिळालं. वाचून आनंद झाला. टेनिसविश्वात तब्बल १७ ग्रँडस्लॅम जेतेपदं, क्रमवारीतील अव्वल स्थान अशा असंख्य विक्रमांसाठी तू फेमस आहेसचं.. परंतु, यावेळी दोन जुळ्या मुलींनंतर पुन्हा एकदा दोन जुळ्या मुलांचा पिता होण्याचे नशीब तुझ्या पदरात पडले…याबद्दल तुझा एक सच्चा टेनिसचाहता म्हणून तुला मनस्वी शुभेच्छा..
पत्नी मिर्काच्या बाळंतपणात तिच्यासोबत राहण्यासाठी माद्रिद टेनिस स्पर्धेतून माघारीची तू केलेली घोषणा सुरूवातीला पटली नाही बुवा..पण, चाहत्यांना गोड बातमी देऊन झालेल्या निराशेची कसर तू भरून काढलीस…पाच वर्षांपूर्वी तुला जुळे कन्यारत्न झाले होते. टेनिसपटू आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या या लेकी टेनिसमध्येच नाव कमावतील अशा अपेक्षाही तुझ्या चाहत्यांनी व्यक्त करण्यास सुरूवात केली…आता या सावित्रीच्या लेकींना मिश्र दुहेरीसाठीचे साथीदार या जुळ्या मुलांच्या रुपाने घरातच मिळाले… त्यामुळे भविष्यात ‘वुमन्स डबल्स’, ‘मेन्स डबल्स’, ‘मिक्स डबल्स’ आणि ‘सिंगल्स’ असे सारे टेनिसविश्वच ‘फेडरर’मय होणार आणि फेडरर घराण्याचे वर्चस्व राहणार अशी चर्चाही होण्यास सुरूवात होईल यात काही शंका नाही..
महान खेळाडूंच्या नशिबात यशोशिखरे, चमत्कारांची नोंद ही सातत्याने होतच असते..मात्र, दोन जुळ्या मुली आणि त्यापाठोपाठ पुन्हा दोन जुळी मुले असा दुर्मिळ योग तुझ्या घरी जुळून आला हा देखील तुझ्या नावावरचा विक्रमच म्हणावा लागेल…
तुझी शांतपूर्ण खेळी आणि वैयक्तिक साधेपणामुळे जगभरातील टेनिसप्रेमींच्या हृदयात आदराने स्थान तू मिळविले आहेस..अगदी भारतीयांच्या गळ्यातील ताईत असलेला मास्टरब्लास्टर सच्चूसुद्धा तुझा फॅन आहे. तुझे सामने पाहण्यासाठीही त्याने आवर्जुन उपस्थिती दर्शविली होती..आपल्या खिलाडूवृत्तीला सांभाळून तू कौटुंबिक जबाबदारीही तितक्याच सहजतेने निभवालीस त्याबद्दलही तुझे कौतुक..
रॉजर, तू आपल्या कौशल्यपूर्ण खेळीने आजपर्यंत सर्वांची मने जिंकलीस..पण मिर्का वहिनींसमोर तू कशी हार पत्करलीस याचीही कथा वाचली..अगदी तुझे ‘लव्ह अफेअर’ सुरू झाल्यापासूनची… रोमान्सचाही तू बादशहा निघालास..मिर्का वहिनीदेखील टेनिसपटू असल्याने वैचारिक पातळीवर मने जुळली असतील असे एका क्षणी वाटले खरे..पण, टेनिसच्या कोटवर बेधडक ‘सर्व्हिस’ करणारा फेडरर प्रेमाच्या बाबतीत घाबरून मिर्काला ‘प्रपोझ’ करण्याची ‘सर्व्हिस’ टाळत होता..हे वाचून तूझीही ‘लव्हस्टोरी’ टीपीकल सामान्य मूलाची ‘लव्हस्टोरी’ असावी तशीच निघाली..याचाही आनंद आहे..
सुरूवातीला तुला गांभीर्याने न घेणाऱया मिर्कासोबत एकदा थेट माध्यमांसमोर तुमच्यातील नात्याची ओळख करून देत..प्रेमाच्या बाबतीतही सर्व्हिससह बोनस पॉईंट मिळविण्याचा तुझा हा हातखंडा देखील आपल्याला बुवा तितकाच आवडला होता..
यावर ‘तुमच्यासाठी कायपण’ म्हणत..पायाच्या दुखापतीमुळे टेनिसमधून निवृत्ती घेण्याची नामुष्की ओढावलेल्या मिर्की वहिणींनी तुझ्या टेनिसमधील प्रगतीबद्दल ‘डायरी’ लिहीण्यास सुरूवात केली..म्हणजे प्रेमही जपले आणि टेनिसही..ही जी काही शक्कल त्यांनी लढविली ना..यातून मिर्का वहिणींनी प्रेमाच्याबाबतीत तुझ्यावर तर सरळ सेटमध्ये विजय प्राप्त केलायं..हे तुलाही पटेल यात काही शंका नसावी..त्यामुळे मिर्कावहिणींनाही मानले बुवा..
विवाहित आयुष्यातही तू टेनिसच्या ‘बिझी शेड्युल्ड’मधून वेळ काढून कौटुंबिक जबाबदाऱया उत्तमरित्या निभावत आलास..यातही पती-पत्नी दोघांनीही एकाच खेळाचे प्रतिनिधीत्व केले असल्यामुळे निर्माण होणाऱया परिस्थितींची कल्पना दोघांनाही असावी..त्यामुळे उत्तम ताळमेळ राखता येत असावा..असो.
पण, तू जुळ्या मुलींचे पालकत्व जसे आजपर्यंत निभावत आला आहेस..त्याचप्रमाणे आता जुळ्या मुलांच्या रुपात खांद्यावरील कौटुंबिक जबाबदारी वाढली असली तरी..टेनिसकोटवर याच वाढीव जबाबदारीखांद्याना सांभाळून डाव्या हाताने टेनिसचेंडु उंचावून…उजव्या हातातील तुझ्या ‘फेव्हरेट’ रॅकेटच्या फटक्यातून तुफान सर्व्हिस होताना दिसेल..आणि इतक्यात तरी कशाला निवृत्तीची बात! असा अॅटीट्युड राखून नदाल, जोकोव्हिच, वॉवरिन्का या युवा खेळाडूंना तगडे आव्हान देत राहशील अशी अपेक्षा..हाच पत्राचा हेतू..जाता जाता पुन्हा एकदा..जुळ्या रत्न लाभाबद्दल शुभेच्छा..

कळावे,
तुझा चाहता