मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कांदिवली येथील मैदानाला सचिन तेंडुलकरचे नाव देण्यास महानगरपालिका गटनेत्यांच्या बैठकीत शुक्रवारी संमती मिळाली. सोमवारी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाईल.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सोमवारी झालेल्या बैठकीत कांदिवली येथील मैदानाला सचिन तेंडुलकरचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे एमसीएचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी याबाबत महापौर सुनील प्रभू यांच्याकडे विनंती केली. पालिकेच्या जागेवरील वास्तूंचे नामकरण करण्याचा अधिकार पालिकेकडे आहे. त्यामुळे नाव देण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक होती. शुक्रवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत विशेष बाब म्हणून एमसीएच्या विनंतीला मान्यता देण्यात आली. २८ ऑक्टोबरला या विषयावर शिक्कामोर्तब होईल. कोणत्याही हयात व्यक्तीचे नाव वास्तूला देण्याची प्रथा पालिकेत नाही. मात्र विशेष बाब म्हणून सचिनचे नाव देण्यात आले आहे. १९६८मध्ये तत्कालीन आयुक्त ज.ह.पटवर्धन यांच्या विनंतीनुसार अपवाद म्हणून स.का.पाटील यांचे नाव देण्यात आले होते. सचिनची असामान्य कामगिरी लक्षात घेऊन या निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रभू म्हणाले.
सचिन तेंडुलकर जिमखाना नावावर पालिकेचे शिक्कामोर्तब
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कांदिवली येथील मैदानाला सचिन तेंडुलकरचे नाव देण्यास महानगरपालिका गटनेत्यांच्या बैठकीत शुक्रवारी संमती मिळाली.
First published on: 26-10-2013 at 05:20 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc permitted kandivali ground as sachin tendulkar gymkhana club