मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कांदिवली येथील मैदानाला सचिन तेंडुलकरचे नाव देण्यास महानगरपालिका गटनेत्यांच्या बैठकीत शुक्रवारी संमती मिळाली. सोमवारी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाईल.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सोमवारी झालेल्या बैठकीत कांदिवली येथील मैदानाला सचिन तेंडुलकरचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे एमसीएचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी याबाबत महापौर सुनील प्रभू यांच्याकडे विनंती केली. पालिकेच्या जागेवरील वास्तूंचे नामकरण करण्याचा अधिकार पालिकेकडे आहे. त्यामुळे नाव देण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक होती. शुक्रवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत विशेष बाब म्हणून एमसीएच्या विनंतीला मान्यता देण्यात आली. २८ ऑक्टोबरला या विषयावर शिक्कामोर्तब होईल. कोणत्याही हयात व्यक्तीचे नाव वास्तूला देण्याची प्रथा पालिकेत नाही. मात्र विशेष बाब म्हणून सचिनचे नाव देण्यात आले आहे. १९६८मध्ये तत्कालीन आयुक्त ज.ह.पटवर्धन यांच्या विनंतीनुसार अपवाद म्हणून स.का.पाटील यांचे नाव देण्यात आले होते. सचिनची असामान्य कामगिरी लक्षात घेऊन या निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रभू म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा