सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने बीएनपी पॅरिबास खुल्या टेनिस स्पध्रेत ऑस्ट्रेलियाच्या कॅसी डेलाक्यूआ आणि समांथा स्तोसूरचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
अव्वल मानांकित सानिया-मार्टिना जोडीने ६८ मिनिटांत ६-३, ७-५ असा सोपा विजय मिळवला. पुढील स्पध्रेत त्यांच्यासमोर स्थानिक खेळाडू व्हॅनिआ किंग आणि तिची रशियाची जोडीदार अॅला क्रुडीव्हत्सेव्हाचे आव्हान असेल.
पुरुष गटात रोहन बोपन्ना आणि त्याचा रोमानियाचा जोडीदार फ्लोरिन मर्गिआ यांना फेलिसिआनो लोपेझ आणि मार्क लोपेझ या जोडीचा सामना करावा लागेल.