जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक विजेता महेंद्र चव्हाण शरीरसौष्ठवपटू घडवणार!
चिपळूणमध्ये तो गुरे राखायची काम करायचा. काहीतरी आयुष्यात करावे, यासाठी त्याने पुणे गाठले, सुरुवातीला वडापावच्या छोटेखानी हॉटेलमध्ये तो कपबशा धुवायचा, बांधकामांच्या ठिकाणी वेठबिगारी करायचा, या अडचणींच्या मॅरेथॉनमधून त्याने आपली वाट निवडली आणि विजिगिषूवृत्तीच्या जोरावर काही दिवसांपूर्वी मंगोलियामध्ये झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालत त्याने भारताचे नाव उंचावले. आता त्याला बरीच आव्हाने खुणावत आहेत, त्यांचा तो पाठलागही करेल, पण हे सारे करीत असताना आपल्या शरीराने दिलेले दान युवा शरीरसौष्ठवपटूंमध्ये वाटण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. यापुढे गरीब घरातल्या शरीरसौष्ठवपटूंना घडवण्याचा वसा त्याने उचलला आहे. त्याचबरोबर अमरावतीमधील एका अपंग शरीरसौष्ठवपटूचा खर्चही उचलण्याचे त्याने ठरवले आहे.
चिपळूणमधले तळसर हे महेंद्रचे मूळ गाव. वडील दोन्ही पायांनी अपंग, आई एका हाताने अपंग. त्यामुळे मामाच्या घरी त्याचे शिक्षण सुरू झाले. आठवणीपर्यंत शिक्षण घेत असताना तो घरची कामे करायचा, त्याचबरोबर गुरे राखायचा. हलाखीची परिस्थिती बदलण्याची धमक त्याच्या मनगटामध्ये होती. काही तरी करून दाखवायचे, या उद्देशाने त्याने पुणे गाठले. बरीच बिगारीची कामे केली. झोपडपट्टीमध्ये राहत असताना त्याला बऱ्याच व्यसनांनी विळखाही घातला होता. पण वेठबिगारी करीत असताना तिथल्या एका मित्राने त्याला व्यायामशाळेत नेले. व्यायामशाळेचे दीडशे रुपये शुल्क भरण्याची त्याची ऐपतही नव्हती. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या विटांपासून व्यायामाचे साहित्य बनवले आणि त्याला प्रारंभ केला.
परवेझ सिंगसारखे गुरू त्याला लाभले. त्याने महेंद्रच्या शरीराला आकार द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला ५०-५५ किलो वजनी गटापासून त्याने सुरुवात केली. आता तो १०० किलो वजनीगटापर्यंत पोहोचला आहे. पहिल्या तीन-चार वर्षांमध्ये त्याला पारितोषिक मिळत नव्हते. २००६मध्ये स्थानिक स्पर्धेत पहिले जेतेपद पटकावले. त्यानंतर बरेच चढ-उतारही आले. पण महेंद्र खचला नाही. या वर्षी त्याने महाराष्ट्र-श्री स्पर्धेत सुवर्णपदक, फेडरेशन चषकामध्ये सुवर्ण, राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य अशी कामगिरी उंचावली. त्यानंतर पहिल्यांदाच जागतिक स्पर्धेत तो उतरला, ४० देशांचे जवळपास पाचशे शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेत उतरले होते आणि त्याच्या या मेहनतीला सोनेरी झळाळी मिळाली. या कामगिरीबाबत महेंद्र म्हणाला, ‘‘हे यश नक्कीच नेत्रदीपक आहे. पण मी दिशाहीन झालेलो नाही. यापुढेही काही ध्येय डोळ्यांपुढे ठेवलेली आहेत. आठवी उत्तीर्ण असल्यामुळे शासकीय नोकरी मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. पण यापुढे शरीरसौष्ठव घडवण्याचे माझे प्रयत्न असतील. गरीब घरांतील मुलांना शरीरसौष्ठव या खेळाचा आहार परवडत नाही. त्यांना काही मदत करण्याची इच्छा आहे. अमरावतीमधील अब्दुल नावाचा एक अपंग शरीरसौष्ठवपटू आहे, त्याला मी मदत करण्याचे ठरवले आहे.’’
आई-वडिलांना मी शरीरसौष्ठवपटू असल्याचे समजले
‘‘यापूर्वी मी शरीरसौष्ठव म्हणजे नेमके काय करतो, हे माझ्या आई-वडिलांना माहिती नव्हते. पण जागतिक स्पर्धा जिंकल्यावर चिपळूणमध्ये भली मोठी विजययात्रा निघाली होती. त्या वेळी घरच्यांचा ऊर भरून आला होता. आपल्या मुलाने नाव उंचावले, त्याचा अभिमान वाटतो, अशी त्यांची भावना होता. पण लोकांनी त्यांना शरीरसौष्ठव खेळाबद्दल माहिती दिली आणि त्यांना आता शरीरसौष्ठवपटू आहे, हे समजले आहे,’’ असे महेंद्र म्हणाला.