दुसरी कसोटी जिंकत मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी न्यूझीलंडला दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या दहा फलंदाजांना बाद करणे आवश्यक होते. ब्रेंडन मॅक्क्युलमचे प्रभावी नेतृत्त्व आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर ४५५ धावांचे लक्ष्य मिळालेल्या इंग्लंडचा डाव २५५ धावांतच आटोपला आणि न्यूझीलंडने दुसरी कसोटी १९९ धावांनी जिंकली. या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.
बिनबाद ४४ वरून पुढे खेळणाऱ्या इंग्लंडच्या डावाला सुरुवातीला ट्रेंट बोल्टने खिंडार पाडले. अ‍ॅलिस्टर कुकने ५६ धावांची खेळी करत प्रतिकार केला. मात्र केन विल्यमसनने त्याला बाद केले. जोस बटलरने १३ चौकार आणि एका षटकारासह ७३ धावांची खेळी करत पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपुराच ठरला. न्यूझीलंडतर्फे मार्क क्रेग आणि केन विल्यमसन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

Story img Loader