Ishita Raj Confessed Love For Hardik: भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि पत्नी अभिनेत्री-मॉडेल नताशा स्टॅनकोविक यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. भारतीय वंशाची ब्रिटीश गायिका जास्मिन वालिया आणि हार्दिक एकमेकांना डेट करत असल्याची बातमी अलीकडेच समोर आली होती. हे दोघेही एकत्र फिरायला गेल्याची चर्चाही सुरू होता. पण आता हार्दिकबाबत एक अशी बातमी समोर आली आहे की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. बॉलिवूड अभिनेत्रीने हार्दिक पंड्यावरील तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

लग्नाच्या ४ वर्षांनंतर नताशा स्टॅनकोविक व हार्दिक पांड्याने नुकताच घटस्फोट घेतला. तेव्हापासून टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. आता अभिनेत्री इशिता राजच्या वक्तव्यामुळे चर्चेला मोठं उधाण आलं आहे.
प्यार का पंचनामा फेम इशिता राजने हार्दिक पांड्यावरील प्रेम व्यक्त केले आहे.

हेही वाचा – Barinder Sran: धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजाने घेतली निवृत्ती, पहिल्याच्य टी-२० सामन्यात घेतले होते ४ विकेट्स

इशिता राजने फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत हार्दिकवरील प्रेम व्यक्त केले आहे. हार्दिक पंड्या तिचा आवडता क्रिकेटपटू असल्याचेही तिने सांगितले आहे. जेव्हा इशिताला हार्दिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली- ‘तो एक महान क्रिकेटपटू आणि अष्टपैलू खेळाडू आहे. त्याची फलंदाजी पाहायला मला खूप मजा येते. माझं त्याच्यावर प्रेम आहे, तो माझ्या आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मधल्या फळीत खेळणारा हार्दिक भारतीय क्रिकेट संघाचा आत्मा आहे. इशिताने असेही सांगितले की तिला हार्दिकवर क्रश आहे आणि ती त्याला खूप आवडते.

हेही वाचा – Joe Root: जो रूटचे कसोटीत विक्रमी ३३ वे शतक, ४ वर्षात १६ कसोटी शतकं झळकावत फॅब फोरमध्ये मिळवलं पहिलं स्थान, विराट कोहली….

हार्दिक पंड्यावरील प्रेमाची कबुली देणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

इशिता राज ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. इशिताने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच तिचा वाइल्ड वाइल्ड पंजाब हा नेटफ्लिक्स OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. याशिवाय ती सोनू के टीटू की स्वीटी आणि प्यार का पंचनामा मधील तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते.

हेही वाचा – Radha Yadav: पुरात अडकली होती भारतीय महिला क्रिकेटपटू, NDRF च्या पथकाने केली सुटका, पोस्ट करत मानले आभार

काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याचे नाव गायिका जास्मिन वालियासोबत जोडले गेले होते. या दोघांचे व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इतकेच नाही तर दोघांनीही एकमेकांच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या. पण दोघांपैकी कोणीही या डेटिंगबाबत वक्तव्य केले नाही.

Story img Loader