दुखापतीमुळे सहा आठवडय़ांच्या विश्रांतीनंतर जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट शुक्रवारी लंडन डायमंड लीगमध्ये १०० मीटर शर्यतीत पुन्हा धावताना दिसणार आहे. मात्र, ही शर्यत जिंकण्यापलीकडे त्याची तंदुरुस्ती आणि कामगिरी याकडे सर्वाचे लक्ष्य असणार आहे.  २८ वर्षीय बोल्ट १३ जूनला अखेरचा शर्यतीत सहभागी झाला होता. त्यात त्याला १९ वर्षीय सहकाऱ्यासोबत धावताना अडचण निर्माण झाली होती. त्यानंतर ओटीपोटाच्या दुखापतीचा औषधोपचार त्याच्यावर सुरू होता. डॉ. हान्स विल्हेल्म मुलर वॉहफार्ट यांच्या देखरेखीखाली बोल्टवर उपचार करण्यात आले. सहा आठवडय़ांच्या विश्रांतीनंतर बोल्ट पुन्हा सरावाला लागला आहे. बोल्टच्या अनुपस्थितीत अमेरिकेच्या जस्टीन गॅटलिनने १०० मीटर व २०० मीटर शर्यतीत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे बोल्टला दमदार कामगिरीचे आव्हान पेलावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा