महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीने पुरुष दुहेरीत ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज आणि जॉनी ओमारा या जोडीचा ६-३, ६-४ असा सहज पराभव करत एमएसएलटीएतर्फे आयोजित टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या अव्वल मानांकित बोपण्णा-दिविज जोडीने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. १ तास ३ मिनिटे रंगलेल्या या एकतर्फी लढतीत बोपण्णा-दिविज जोडीने पहिला सेट ६-३ असा सहज जिंकून विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली.

दुसऱ्या सेटमध्येही बोपण्णा-दिविज जोडीने आपले वर्चस्व कायम राखले. प्रारंभीच्या २-२ अशा बरोबरीनंतर बोपण्णा-दिविज जोडीने ४-२ अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर बांब्रिज-ओमारा यांनी सामन्यात पुनरागमन करून ४-४ अशी बरोबरी साधली. अखेर पुन्हा एकदा प्रतिस्पध्र्याची सव्‍‌र्हिस मोडीत काढत बोपण्णा-दिविज जोडीने ६-४ अशा फरकासह विजेतेपदावर नाव कोरले.