‘इंडो-पाक एक्स्प्रेस’ अर्थात रोहन बोपण्णा आणि ऐसाम उल हक कुरेशी जोडीने एटीपी एपिआ आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या उपांत्यफेरीत धडक मारली, तर दुसऱया बाजूला लिएण्डर पेस आणि राडेक स्टेपनाक जोडीला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे.
बोपण्णा-कुरेशी जोडीने उपांत्यपूर्व फेरीत ट्रिट ह्य़ू आणि डॉमिनिक इंगलोट जोडीचा ६-७(३), ७-६(५), १०-३ अशा सरळ सेट मध्ये पराभव केला आणि स्पर्धेच्या उपांत्यफेरीत फेरीत प्रवेश केला. बोपण्णा-कुरेशी जोडीसमोर उपांत्यफेरीत आता लुकास रोसोल आणि जाओ सौसा यांचे आव्हान असणार आहे.
पेस-स्टेपनाक जोडीला ज्यूलेइन बेन्नेटॅयू आणि रॉजर वासेलिन या फ्रेंच जोडी विरुद्धच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. सुरुवातीला जमेच्या बाजूने असणाऱया पेस-स्टेपनाक जोडीने दुसऱया सेटपासून पुढे निराशाजनक कामगिरी केली. याचे रुपांतर पराभवात झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा